MADC does not have an updated list of companies How will new companies come : नवीन कंपन्या येणार कशा ?
Nagpur MIHAN ‘मिहान’ प्रकल्पात एकीकडे कंपन्यांनी फारशी रुची दाखविली नाही. अशा स्थितीत दुसरीकडे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा (MADC) गलथानपणादेखील समोर आला आहे. एमएडीसीकडे कंपन्यांची अद्ययावत यादीच नाही. अशा कारभारामुळे नवीन कंपन्या येणार तरी कशा, असा सवाल उपस्थित होत आहे.
विदर्भाची आर्थिक स्थिती पालटण्याची क्षमता असलेला मिहान प्रकल्प पुन्हा संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या डब्ल्यू बिल्डिंगमधील कार्यालयात मार्केटिंगची चमूच नसल्याचे वास्तव आहे. मिहानमध्ये गुंतवणूक वाढावी. गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना विलंब होऊ नये. म्हणून दीड वर्षाआधीच ‘एमएडीसी’च्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यावर सोपवण्यात आली.
Dharmaraobaba Atram : मी १०० टक्के मंत्री होणार, धर्मरावबाबांना विश्वास !
जिल्हाधिकाऱ्यांनी एक ‘लाइव्ह ॲप’ सुरू करण्याची घोषणा केली होती. प्रशासनाने आजपर्यंत असे ॲप विकसित केले नाही. शिवाय एमएडीसीची वेबसाइट अपडेट नाही. कार्यरत कंपन्या आणि जागा अडवून ठेवलेल्या कंपन्यांची नावे वेबसाइटवर जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे मिहान प्रकल्पाचा विकास आणि रोजगाराची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. प्रकल्पाची संपूर्ण माहिती स्थानिकांसह देशभरातील उद्योजकांना करून देण्यात येणार आहे.
या उद्देशाने वेबसाइटवर टाकण्याची मागणी आता उद्योजक संघटनांकडून होऊ लागली आहे. शिवाय उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांच्या फाइलचा निपटारा नागपूर कार्यालयात करावा, अशी उद्योजकांची मागणी आहे. सद्य:स्थितीत मिहानचा विकास पूर्णत: थांबलेला आहे. मुख्य म्हणजे वर्षभरात मिहानमध्ये कुठलीही मोठी गुंतवणूक आलेली नाही. लाइव्ह ॲप सुरू झाल्यास युनिट सुरू करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांचा प्रस्ताव कुठल्या स्तरावर आहे.
Ajit Pawar will ask Dhananjay Munde to resign : ..तर अजित पवार घेतील धनंजय मुंडेंचा राजीनामा !
याची माहिती मिळू शकेल. तसेच त्यांना सतत मुंबईची वारी करावी लागणार नाही. अनेक कंपन्यांना जुन्याच समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे