Minister Ashok Uike : कचारगड यात्रेच्या नियोजनात कुठलीच कसर नको!

Make the micro planning of Kachargarh Yatra : आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा

Gondia आदिवासी कुलदैवतेचे श्रध्दास्थान म्हणून कचारगड देवस्थान प्रसिध्द आहे. या ठिकाणी दरवर्षी फरवरी माघ पौर्णिमेनिमित्त पाच दिवसाच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते. यात्रेत झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व इतर राज्यातुन भाविक येथे येतात. यात्रेदरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही त्यादृष्टीने प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान यात्रा भरणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. परिणय फुके, राजकुमार बडोले, संजय पुराम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांची उपस्थिती होती.

53rd ABVP vidarbha Conference : २३ जिल्ह्यांतील २३०० कार्यकर्ते अन् तरुणाईचा उत्साह!

कचारगड यात्रेनिमित्ताने स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचा नियोजनबध्द कृती आराखडा तयार करुन रस्त्याच्या दोन्ही बाजुला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. भक्त निवासाची व्यवस्था करण्यात यावी. विद्युत व्यवस्था करताना अधिक समयसूचकतेने नियोजन करावे, असंही ते म्हणाले.

यात्रेदरम्यान वीज खंडीत होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे आवश्यक आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य पथक तैनात करण्यात यावे. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवावा. स्वच्छता उत्तम ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना उईके यांनी बैठकीत केल्या.

यात्रेदरम्यान १५ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नगर परिषद मोबाईल टॉयलेट, अग्नीशमन व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे अंमलबजावणी यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. कचारगड देवस्थान येथून जवळच असलेल्या हाजराफॉल पर्यटन स्थळ येथे सुध्दा योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांनी कॉल केला तरीही निधी मिळाला नाही

यात्रेदरम्यान नियंत्रण कक्ष स्थापन करणे, रस्त्यातील खड्डे बुजविणे, विजेची अखंडीत सोय, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.