Breaking

Minister Jaykumar Rawal : सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ

Extension of six days for purchase of soybean : पणन मंत्री जयकुमार रावल यांचा दिलासा; 6 फेब्रुवारीपर्यंत खरेदी

Mumbai राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरू आहे. 31 जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. आणखी काही दिवस खरेदी सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार होता. यासंदर्भात राज्यभरातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निवेदने दिली होती. मागणीदेखील लावून धरली होती. त्यानुसार आता मुदतवाढ देऊन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला आहे. सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

Nana Patole : महाकुंभातील दुर्घटनेवर संघाचे मौन का?

मंत्री रावल म्हणाले की, राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आज ती मुदत संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी अशी राज्यातील लोक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेता यासाठी आमचा प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू होता. आज ती मुदतवाढ मिळाली.

या मुदतवाढीमुळे राज्याला दिलेल्या 14 लाख 13 हजार 269 मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट पूर्ण करता येणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असंही ते म्हणाले.

राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर 30 जानेवारीपर्यंत 4 लाख 37 हजार 495 शेतकऱ्यांकडून 9 लाख 42 हजार 397 मेट्रिक टनापेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झाली आहे. दि.6 फेब्रुवारीपर्यंत या आकड्यात मोठी वाढ होऊन समाधानकारक खरेदी होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहे, असंही ते म्हणाले.

Chief Secretary of Maharashtra : मुख्य सचिवांचा सल्ला, ‘उत्पन्नाचे स्रोतही वाढवा’

काही जिल्ह्यांना उद्दिष्टे वाढवून दिली आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषीमंत्री आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.