Chhagan Bhujbals revelation, discussion in political circles : छगन भुजबळांचा खुलासा, राजकीय वर्तुळात चर्चा
Nashik : राज्यात कृषी खात्याभोवती राजकीय वादळ निर्माण झालेलं असताना, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट कृषीखात्याबाबत मोठा दावा केला आहे. “अजित पवारांनी मला कृषी खात्याची ऑफर दिली होती”, असं भुजबळ यांनी जाहीरपणे सांगितल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली आहे.
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांनी मला कृषी खाते स्वीकारण्याचा आग्रह केला होता. तेव्हा अजितदादांनी अर्थ खातं स्वतःकडे घेतलं आणि उरलेली खाती माझ्यासमोर ठेवली. ‘तुम्हाला जे हवं ते घ्या’, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी कृषी खातं माझ्यासाठी सुचवण्यात आलं होतं.”
मात्र, भुजबळ यांनी ही ऑफर नाकारली. “माझं राजकारण शहरी भागात, विशेषतः मुंबईत घडलेलं आहे. ग्रामीण भागाशी माझा थेट संबंध कमी आहे. कृषी खाते एखाद्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या नेत्याकडेच असावं, असं मी सुचवलं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
Maharashtra politics : मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही
सध्या कृषी खात्याची धुरा दत्तात्रय भरणे यांच्या हाती देण्यात आली आहे. त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत भुजबळ म्हणाले, “भरणे मामा बालपणापासून ग्रामीण भागात राहिले आहेत. त्यांना शेती, शेतकरी, आणि त्यांच्या समस्या यांचा अनुभव आहे. त्यामुळे ते या खात्याला योग्य न्याय देतील, याची मला खात्री आहे.”छगन भुजबळांनी हेही नमूद केलं की, “प्रत्येक खातं हे महत्त्वाचंच असतं. मंत्री म्हणून आपण त्या खात्याशी किती बांधिलकीने काम करतो, यावर त्याचं यश अवलंबून असतं.”
Dattatray Bharane : शेतकऱ्यांना न्याय, नाविन्यपूर्ण शेतीला चालना, यासाठी प्रयत्न करणार
गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त विधानं आणि सभागृहात रमी खेळताना आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कृषी खातं चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं. यावरून कोकाटे यांची उचलबांगडी करत त्यांच्याकडील खाते काढून घेण्यात आलं असून, त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभाग देण्यात आला आहे. त्यांची जागा आता दत्तात्रय भरणे यांनी घेतली आहे. छगन भुजबळांचा कृषी खात्याबाबतचा खुलासा याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.