Decline in the number of ST passengers is matter of concern : एसटीच्या प्रवाशी संख्येत घट, परिवहन मंत्र्यांना लक्ष घालण्याचे आवाहन
Yavatmal एसटीची भाडेवाढ झाल्यावर दहा टक्क्यांनी प्रवाशी संख्येत घट झाल्याचे या पूर्वी निदर्शनास आले आहे. दोन महिने उलटून गेले तरी परिस्थिती पूर्व पदावर न येणे व प्रवासी संख्येत मोठी घट होणे हा चिंतनाचा व चिंतेचा विषय आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. असे मत महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
बरगे हे आज यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विभागीय कार्यालय-यवतमाळ, पुसद, दिग्रस व वणी आगारांना भेटी दिल्या व एसटी कामगारांचे प्रश्न समजून घेतले. त्यानंतर एसटीच्या यवतमाळ येथील विभागीय कार्यालयासमोर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की, मार्च महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या आठरा दिवसात प्रवाशी संख्येत प्रतिदिन सरासरी तीन लाखांनी घट होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्या मध्ये प्रामुख्याने जुन्या मोडकळीस आलेल्या गाड्या, पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध नसणे, भाडेवाढ झाल्यानंतर आगार व विभाग अथवा मध्यवर्ती कार्यालय पातळीवर या संदर्भात आढावा घेऊन ज्या मार्गावर प्रवासी संख्या कमी आहे.
Pratap Sarnaik : आता व्हॉट्सअॅप नंबरवर करा मुजोर रिक्षा/ टॅक्सी चालकांची तक्रार !
त्या ठिकाणी वाढ होण्यास उपाययोजना करण्याचा अभाव, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुट्या पैशावरून वाहक व प्रवाशी यांच्यात दररोज वादावादी होत असल्याने सुटे पैसे नसतील तर प्रवासी गाडीत बसायला तयार नाहीत.हे सुद्धा एक मुख्य कारण असू शकते. या सर्व विषयात आता वरिष्ठ पातळीवर चिंतन करण्याची गरज असून या शिवाय सरकारने वेळीच आर्थिक मदत केली नाही तर या पुढे स्पेअर पार्टस व इंधनासाठी गाड्या थांबतील व कर्मचाऱ्यांना भविष्यात निवृत्ती नंतरची देणी मिळणार नाहीत अशी विदारक स्थिती असल्याचेही बरगे यांनी स्पष्ट केले.
यवतमाळ जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांची देणी सुद्धा मोठ्या प्रमाणात थकली असून दिवाळी सण उचल मागणी करणाऱ्या १८२०कर्मचाऱ्यांना २ कोटी २७ लाख इतकी रक्कम अद्यापि मिळालेली नाही. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या रमजान ईद सणासाठी उचल मागणी करणाऱ्या १५८ कर्मचाऱ्याना अंदाजे २० लाख रुपये इतकी रक्कम मिळालेली नाही.या शिवाय नाताळ सणासाठी सण उचल मागणी करणाऱ्या ६९ कर्मचाऱ्यांना ८ लाख ६२हजार रुपये इतकी रक्कम मिळाली नाही.
Pratap Sarnaik : एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार ‘लालपरी’ खरेदी करणार!
नोव्हेंबर पासून पी. एफ. अँडव्हान्स रक्कम मागणाऱ्या २२७ कर्मचाऱ्यांना २ कोटी ७८ लाख रुपये इतकी रक्कम मिळाली नसून वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती रक्कम १ कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम गेले वर्षभर प्रलंबित आहे.एकूण थकीत देणी रक्कम देण्यात आलेली नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले असून अत्यावशक सेवा म्हणून स्वतः सण साजरे न करता प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुट्टी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना व कुटुंबियांना स्वतःला सण साजरे करण्यासाठी उचल रक्कम न मिळणे ही चिंतेची बाब आहे .
Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 पुन्हा दावोसमध्ये
त्याचा त्यांच्या कामावर व गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत असून औद्योगिक अशांतता निर्माण होत असल्याने वारंवार आंदोलने सुरू असून त्याचाही परिणाम होत असल्याचे बरगे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यातील या दौरा कार्यक्रमात संघटनेचे सह सरचिटणीस चंदन राठोड, विभागीय अध्यक्ष भगवान हरसुले, विभागीय सचिव सुशांत इंगळे, प्रसिद्धी सचिव गणेश शेंडगे, अमजद खान, सय्यद जहीर, समाधान चोंडकर, राहुल डाखोरे, नवलकुमार गवई, विनोद चव्हाण, सतीश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.