Mission-28 Program : अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासन गतिमान

Amravati collector receives administration efficiency award : मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; ‘मिशन-28’ उपक्रमासाठी पुरस्कार

Amravati मेळघाटच्या दुर्गम भागातील माता व बालकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मिशन-28’ या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्य शासनाच्या प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानांतर्गत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सौरभ कटियार Saurabh Katiyar यांना मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती. या पुरस्कारासोबत जिल्हाधिकारी कटियार यांना ३० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. ‘मिशन-28’ उपक्रमाद्वारे मेळघाटातील 28 अतिदुर्गम गावांमधील माता व बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आरोग्यसेवा, तपासण्या, पोषण व्यवस्थापन आणि जनजागृती यामध्ये सातत्याने कार्य करण्यात आले. या उपक्रमामुळे बालमृत्यूदर व माता मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली असून, त्याचीच दखल राज्य शासनाने घेतली.

Sahasram Korote : ‘माजी’ झाले तरी ‘आजी’चा मोह जाईना!

दरम्यान, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभाग, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती यांनी सादर केलेल्या ‘उत्कृष्ट आयटीआय, रोजगार मेळावे आणि संवाद फोरम’ या उपक्रमासाठी १० लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. या पुरस्काराचा स्वीकार सहसंचालक प्रदीप घुले यांनी केला.

Teacher recruitment Scam : शिक्षक पदभरतीतील फाईलींच्या चौकशीचे आव्हान

राज्यभरातून अनेक शासकीय विभाग व कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय निवड समितीने प्राप्त प्रस्तावांचे मूल्यमापन करून विजेत्यांची निवड केली. विजेत्या कार्यालयांना मिळालेली पारितोषिक रक्कम ही संबंधित उपक्रमांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी वापरणे बंधनकारक आहे.