Gundagardi politics will not be tolerated in Sovner : आमदार देशमुख यांनी केदारांना डिवचले
Nagpur सावनेरमधील भाजपने नवनिर्वाचित आमदार आशीष देशमुख यांनी मतदारसंघातील प्रस्थापितांना खुले आव्हान दिले आहे. या मतदारसंघात गुंडागर्दीचे राजकारण खपवून घेणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. सावनेरमध्ये मागील अनेक वर्ष काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनिल केदार यांचे एकहाती वर्चस्व होते. आता देशमुख यांचा रोख केदार यांच्याकडेच असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सावनेर विधानसभा जिंकल्यापासूनच आशीष देशमुख फॉर्मात आहेत. मतदारसंघातील अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यासाठी तर ते स्वतःच रस्त्यावर उतरले. आता त्यांनी थेट केदार कुटुंबावरच शरसंधान साधले आहे. सावनेर विधानसभा मतदारसंघातील विविध कारणांवरून आमदार देशमुख यांनी केदार यांना खुले आव्हान देताना डिवचले आहे. मतदारसंघात यापूर्वी दबावाचे, अवैध धंद्याचे, गुंडागर्दीचे राजकारण होते. यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
Nagpur Police : गर्लफ्रेंडला आयफोन देण्यासाठी केल्या चोऱ्या !
या मतदारसंघात अनेक वर्ष केवळ केदारांचीच सत्ता होती. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय सर्वस्वी केदार हेच घ्यायचे. मात्र विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी केदारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. आता देशमुख यांनी केदारांनाच खुले आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सर्वात आधी पाटणसावंगी येथे सुरू असलेला टोल नाका बंद करण्याचे आदेश दिले. तर अवैध वाळू तस्करांकडे आपला मोर्चा वळवला.
Mahayuti Government : एसटी महामंडळातील इतर घोटाळ्यांची चौकशी कधी ?
आता ते मतदारसंघात विकास आला नसल्याचा आरोप करत येथे विकासगंगा खेचून आणू, असा दावा करत आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी नव्या योजना आखण्यात आल्या असून त्या आपण पूर्ण आपण करू. मतदारसंघातील कळमेश्वरला नागपूरची सॅटेलाइट सिटी म्हणून आपण पुढे आणू, असे त्यांनी सार्वजनिक मंचावर सांगितले आहे.