Revenue offices in Katol and Narkhed talukas will get own building : महसुल अधिकारी व राजस्व मंडळ अधिकारी कार्यालयांना मिळणार हक्काची इमारत
Katol काटोल व नरखेड येथील तलाठी कार्यालयांच्या इमारतीसाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे काटोल व नरखेड तालुक्यातील तलाठी कार्यालयांना भाड्याच्या कार्यालयातून आता हक्काची इमारत मिळणार आहे. काटोलचे आमदार चरणसिंह ठाकूर (Charan Singh Thakur) यांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे.
गावांच्या विकासासाठी तसेच महत्त्वाचे कामासाठी ग्राम महसुल अधिकारी (तलाठी)हे पद फारच महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित गावात त्यांचे कार्यालय असावे, यासाठी काटोलचे आमदार चरण सिंह ठाकूर प्रयत्नशील होते. आता काटोल/नरखेड तालुक्यातील भाड्याच्या घरात राहत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयांना हक्काच्या इमारती मिळणार आहेत.
District Bank Director Disqualification Case : बच्चू कडूंना संचालकपदासाठी अपात्र का ठरवू नये?
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयाच्या शासकीय इमारतीसाठी प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. लवकरच काटोल/ नरखेड तालुक्यातील 49 ग्राम महसुल अधिकारी (तलाठी), व 10 राजस्व मंडळ कार्यालय स्वतःच्या इमारतीत दिसून येणार आहेत. काटोल तालुक्यातील 43 कार्यालय आहेत त्यापैकी 24 तलाठी, व 04 राजस्व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी 04.46कोटी रुपये. तसेच नरखेड तालुक्यातील 25 महसुली अधिकारी (तलाठी) व 06 राजस्व मंडळ अधिकार्यांचे कार्यालयासाठी 05.कोटी ५ लाख रुपये असे. एकूण 10.51 कोटी रूपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
यामुळे काटोल/नरखेड तालुक्यातील ग्राम महसुल अधिकारी व राजस्व मंडळ अधिकाऱ्यांकरीता आता शासकीय इमारती लवकर उभ्या राहणार आहेत. काटोल नरखेड/ महसुल अधिकारी व राजस्व मंडळ निरिक्षक कार्यालयासाठी आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे राजस्व मंत्री तसेच नागपुर जिल्हा पालकमंत्री यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी लवकरच बांधकामाची निविदा काढली जाणार असल्याची माहिती आहे