Breaking

MLA Harish Pimple : आमदाराला शिविगाळ, पोलीस निरीक्षक निलंबित

 

Police inspector suspended for abusing MLA : आमदार पिंपळे यांच्यासोबत गैरवर्तणुक भोवली

Akola बार्शिटाकळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांना कर्तव्यावर असताना केलेल्या असभ्य आणि गैरजबाबदार वर्तनामुळे तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. २० एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने अकोला पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अंमलदारांनी सदर वाहनाची तपासणी केली. तपासणी दरम्यान अनधिकृत वस्तू आढळल्याचे सांगण्यात आले. मात्र गाडी सोडून देण्यात आल्यामुळे यासंदर्भातील माहिती आमदार हरीश पिंपळे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी पोलिस निरीक्षक तुनकलवार यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर आमदारांचे कार्यकर्ते हरीश वाघ यांनीही तुनकलवार यांच्याशी संपर्क साधला.

Chandrashekhar Bawankule : बदललेल्या सकारात्मक वातावरणाला गालबोट लावले !

मात्र, त्या वेळी तुनकलवार यांनी अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट यांनी प्राथमिक चौकशी केली. चौकशीमध्ये हे स्पष्ट झाले की, पोलीस निरीक्षक तुनकलवार यांनी कार्यकर्त्यांशी अत्यंत असभ्य भाषा वापरली आणि कोणतीही स्टेशन डायरीत नोंद न करता गंभीर दुर्लक्ष केले. हरीश वाघ यांनी दिलेली मोबाईल कॉलची रेकॉर्डिंग तपासणीदरम्यान सादर करण्यात आली असून, त्यावरून दोष सिद्ध होतो.

Jammu – Kashmir Attack : नागपुरातील दोनशेवर पर्यटक अद्यापही अडकून, पण सुरक्षीत !

या वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार, पोलिस निरीक्षक तुनकलवार यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीदरम्यान त्यांचे मुख्यालय अकोला पोलीस नियंत्रण कक्ष असेल. अधीक्षकांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.

निलंबनाच्या काळात त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार निर्वाहभत्ता मंजूर केला जाईल. मात्र त्यांनी कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय केल्यास त्यांना हा भत्ता मिळणार नाही आणि ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील.