Sant Chokhamela birth anniversary celebrated in Mehuna Raja : मेहुणा राजात चोखामेळा यांचा जन्मोत्सव उत्साहात
Buldhana संत चोखामेळा यांच्या जन्मोत्सवात मेहुणा राजा येथे राजकीय शेरेबाजी झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांवर टीका करण्यात आली. त्याचवेळी प्रशासनालादेखील धारेवर धरण्यात आले. माजी आमदारांवर टीका केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जन्मस्थळाचा विकास व्हायला हवा होता, तो झाला नाही. मोठमोठ्या वल्गना करून केवळ भूमिपूजन करण्यात आले. विकासाची एकही वीट येथे अजून चढली नाही, अशी टीका माजी आमदारांवर करण्यात आली.
माजी आमदारांवर झालेली टीका राष्ट्रवादीचे नेते राजू चित्ते व रवी काकडे यांना खटकली. त्यामुळे त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. टीकाकारांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव नसतानाही त्यांना बोलण्याची संधी का दिली, असा सवालही प्रशासनाला विचारला. त्यामुळे एका मंगलमय कार्यक्रमानंतर राजकीय आखाडा रंगल्याचे बघायला मिळाले. पण त्यात प्रशासनाला ओढण्यात आले, त्यामुळे राजकीय पक्ष एकेमेकांपुढे आले नाही, हे महत्त्वाचे.
Nagpur Police CM Devendra Fadnavis : नागपूरचा ‘खुफिया’ विभाग करतोय तिकीट विक्री !
संत चोखमेळा यांचा ७५७ वा जयंती उत्सव मेहुणा राजा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार तोताराम कायंदे आदींची उपस्थिती होती. मनोज कायंदे म्हणाले, ‘चोखामेळा यांचा जन्म १४ जानेवारी १२६८ ला मेहुणा राजा याठिकाणी झाला. त्यामुळे ही पावनभूमी आपण मानतो. मात्र जोपर्यंत लोकांच्या मनात संत चोखामेळा वसणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा जन्मोत्सव लोकोत्सव होणार नाही.’ चोखामेळांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील कायंदे यांनी यावेळी दिली.
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या उपस्थितीत सूर्योदयसमयी विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. तसेच पालखी मिरवणूक काढण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा, यासाठी प्रयत्न केले. लोकसहभाग आणि प्रशासनाची कमतरता आहे. त्यामुळे हा उद्देश साध्य होऊ शकला नाही. मतदारसंघात ‘आता नवा गडी नवा राज’ आल्याने नक्कीच या जन्मस्थळाचे रूप पालटेल, अशी अपेक्षा आहे.’