Officials absent in water shortage meeting : अधिकारी गैरहजर, आमदार मनोज कायंदे संतापले
Buldhana सिंदखेडराजा मतदारसंघातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी अलीकडेच पंचायत समिती येथे बैठक घेण्यात आली. आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीला अधिकाऱ्यांनीच दांडी मारली. त्यामुळे आमदार महोदय चांगलेच संतापले. विशेष म्हणजे ज्यांच्या माध्यमातून पाणी टंचाईच्या संदर्भात नियोजन होणार आहे, त्या अधिकाऱ्यांचाच दुष्काळ बैठकीत बघायला मिळाला.
तालुक्यात गाजत असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे अनेक ठेकेदारांनी देखील या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे बैठकीत या प्रकरणावर जोरदार चर्चा झाली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, विष्णू मेहेत्रे, शामभाऊ जुनेद अला, युवराज नागरे, बीडीओ म्हस्के, विस्तार अधिकारी घुगे पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष भगवान पालवे, रामकिशन नागरे, प्रकाश मुंडे, ग्रामसेवक अशोक बुरकुल, व्ही. एस. सातपोते, अविनाश नागरे आदींची उपस्थिती होती.
Dilip Sananda : दिलीप सानंदाही काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर?
१०४ गावांतील पाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या दिरंगाई आणि कामातील अनियमितता यावर आमदार कायंदे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सिंदखेडराजा तालुका शंभर टक्के पाणीटंचाई मुक्त झाला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
Pravin Darekar : मुख्यमंत्र्यांनी शेतकरीकेंद्री दृष्टीकोन समोर आणला !
जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. या वेळी तालुक्यातील अनेक सरपंच, ग्रामसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.