Breaking

MLA Nitin Deshmukh : झुंडशाहीला प्रत्युत्तर देणारच; दबावाला बळी पडणार नाही

Attempts to suppress the voice of the opposition through force of power : आमदार देशमुख आक्रमक; नियोजन सभा माध्यमांपासून लपवून का घेता?

Akola सत्तेच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या सातत्याने सुरू आहे. झुंडशाही व गुंडशाहीला कदापि थारा दिला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपनेते आणि आकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे. “नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहू आणि जशास तसे उत्तर देऊ,” असेही ते म्हणाले.

“लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे, जनतेच्या प्रश्नांवर न्याय मागणे, हा विरोधकांचा अधिकार आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही लोकशाही मार्गाने लढत असून, कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही,” असंही ते म्हणाले.

Fraud Teachers appointment : बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा सूत्रधार शिक्षण मंडळाचा अध्यक्ष?

त्यांनी यावेळी जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये होणाऱ्या अकार्यक्षमतेवरही जोरदार टीका केली. “दलित वस्ती योजनांचा ३६ कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. इतर विकास कामांचा २९ कोटींचा निधी परत गेला आहे. जनतेच्या कल्याणासाठी आलेला निधी उपयोगात न आणणे ही गंभीर बाब आहे. याला जबाबदार कोण? याचे उत्तर सरकारने द्यावे,” अशी मागणीही त्यांनी केली.

देशमुख यांनी जिल्हा नियोजन सभेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “नियोजन सभा गुप्तपणे का घेण्यात आली? प्रसारमाध्यमांना सभागृहात प्रवेश नाकारणे ही लोकशाहीविरोधी बाब आहे. माध्यमांनाही मज्जाव करण्यात येतोय, म्हणजे सभागृहाबाहेर सत्य पोहचू नये अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता दिसते,” असा आरोप त्यांनी केला.

MSEB Mahavitaran : गावकरी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाच्या तयारीत

“प्रशासनाचे निर्णय व कामकाज हे पारदर्शक असणे आवश्यक आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती मिळणं गरजेचं आहे. मात्र सत्ताधारी ही माहिती दडवत आहेत,” अशी टीका करीत त्यांनी शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.