Demand of 25 lakhs to suppress corruption in Municipal Corporation : आमदार नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट; नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप
Akola अकोला महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानपरिषदेत एका स्थानिक आमदाराने उपस्थित केला होता. भाजपच्या सत्तेतील अकोला महानगरपालिकेतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माझ्यामार्फत संबंधितांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, मी त्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (शिवसेना – ठाकरे गट) यांनी आज येथे केला.
अकोल्यात माध्यमांशी संवाद साधताना नितीन देशमुख म्हणाले, “ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं, ही वस्तुस्थिती आहे,” या वक्तव्यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे अडचणीत आल्या आहेत. त्यांनी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हे विधान केलं होतं.
Bhimashankar Jyotirlinga : या सुविधांमुळे ६० गावांतील भक्तांची सोय!
शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हे यांचा निषेध नोंदवला आहे. अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. आमदार नितीन देशमुख यांनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले.
ते पुढे म्हणाले, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे भ्रष्टाचारासंदर्भातील लक्षवेधी सूचना आली की त्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली जाते. माझ्याही बाबतीत असेच घडले. भाजपच्या सत्तेतील अकोला महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात विधान परिषदेत एका स्थानिक आमदाराने प्रश्न उपस्थित केला होता. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठका झाल्या होत्या.
त्यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः मला सांगितले होते की, ‘आपण विरोधी पक्षातील लोकांना सहकार्य करू. विधान परिषदेत उपस्थित केलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा दडपण्यासाठी तुम्ही संबंधितांकडे २५ लाख रुपयांची मागणी करा.’ मात्र, मी त्यांना स्पष्ट नकार दिला. असे कृत्य मी करू शकत नसल्याचे त्यांना सांगितले. विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेसंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांनीच २५ लाख रुपयांची मागणी केली होती.
Project Victims of Amravati : पालकमंत्र्यांनी पुनर्वसित गावांना घ्यावे दत्तक!
नितीन देशमुख पुढे म्हणाले, “त्या माजी आमदारांचे नाव घेण्याची इच्छा नाही. पण त्यांनीच विधान परिषदेत अकोला महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या मुद्द्यावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दोन वेळा बैठक घेतली. मात्र, नंतर माझ्यामार्फत २५ लाख रुपयांची मागणी केली होती.” शिवसेना (ठाकरे गट) यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे.