Solve the problems of booth heads : आमदार देशमुखांच्या सूचना; मेहकरात ठाकरे गटाची आढावा बैठक
Buldhana शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार बुथ प्रमुखांचा संघटनात्मक महत्त्व मोठं आहे. Uddhav Balasaheb Thackeray Shivsena पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी बुथ प्रमुखांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे मत उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना बुथ प्रमुखांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या सूचना केल्या.
उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व असलेल्या शिवसेनेच्या बुलढाणा जिल्हा संघटनाच्या विभागीय आढावा बैठकीचे आयोजन बुधवारी मेहकरमध्ये करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षतेखाली जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर होते. यावेळी जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, सह-संपर्क प्रमुख छगन दादा मेहेत्रे, उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजयाताई खडसान, जिल्हा संघटक गोपाल बछिरे आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये उपस्थित मान्यवरांनी शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर चर्चा केली आणि एकजुटीने कार्य करण्याचे निर्देश दिले. विशेषतः बुथ प्रमुखांच्या कामकाजावर भर दिला गेला. कारण त्यांच्या मेहनतीमुळेच स्थानिक पातळीवर संघटनाच्या कार्याचा विस्तार होतो, असंही देशमुख म्हणाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांनी राष्ट्रीय काँग्रेस (शरद पवार गट) सोडून शिवसेनेत प्रवेश केला.
बुथ प्रमुखांच्या अडचणी सोडवाव्यात. यामुळे संघटना वाढीस चालना मिळते. बुलढाणा जिल्ह्यात आपले संघटन क्रमांक एकवरच राहिले पाहिजे, असा विचारही यावेळी नेत्यांनी मांडला.
Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे आणखी एक फलीत
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, शहर प्रमुख किशोर गारोळे, युवा सेना तालुका अधिकारी आकाश घोडे, महेंद्र पाटील, ॲड. दीपक मापारी, लखन गाडेकर, किसनदादा धोंडगे, विधानसभा संघटक किसन पाटिल, आदींसह इतर उपस्थित हाेते.