Breaking

MLA Rajesh Bakane : अनधिकृत आदेश, तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी

Plot sold despite not being registered with MahaRERA : महारेराकडे नोंद नसतानाही भूखंडाची विक्री

Wardha सर्व नियम धाब्यावर बसवून भूखंडाची विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये जे अधिकारी दोषी असेल त्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंगणघाटचे तत्कालीन तहसीलदार सतीश मसाळ यांनी आर्वी (छोटी) येथील अमोल सुरेश सातोकर यांना जमिनीचा अनधिकृतरीत्या अकृषक परवाना दिला. कोणत्याही सोयीसुविधा नसताना तसेच महारेराकडे नोंद नसतानाही त्या लेआऊटमधील भूखंडाची विक्री करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेले नगर रचनाकार, दुय्यम निबंधक यांच्यासह तत्कालीन तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी केली आहे.

Education in Gondia : गोंदियातील २२८ शाळांचा वीजपुरवठा खंडित

केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत चिचोली-वाघोली-इंझाळा-येरणवाडी-आर्वी (छोटी)-वडनेर हा रस्ता मंजूर झाला आहे. त्यासाठी १८ कोटी ५५ लाखांचा निधीही प्राप्त झाला. या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हा रस्ता भूमी अभिलेख कार्यालयाने चिन्हांकीत केल्यानुसार लेआऊटसाठी प्रस्तावित असलेल्या रस्त्यामधून जातो, असे सांगितले जाते.

Local Body Elections : आमगाव तालुक्यातील महिला राज!

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले असता लेआऊटधारक अमोल सातोकर यांनी काम अडवून धरले. त्यामुळे त्यांच्या लेआऊटची माहिती घेतली असता त्या लेआऊटला अनधिकृतरीत्या परवाना दिल्याचे समोर आले आहे. सध्या या लेआऊटमधील भूखंडाची विक्री अनिल लेखराजानी आणि लक्ष्मीकांत भगत हे करीत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी भाजपचे महामंत्री राहुल चोपडा, आर्वी (छोटी)चे सरपंच नारायण खोडे, योगेश खोडे, कैलास जयपूरकर आदी उपस्थित हाेते.