Breaking

MLA Randhir Sawarkar : आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

Aggressive stance on teacher pay issues : शिक्षकांच्या वेतनविषयक समस्यांबाबत आक्रमक भूमिका

Akola वेतन पथक अधीक्षक कार्यालयाद्वारे शिक्षकांना वेतन व इतर वेतनविषयक सेवा पुरविण्यात येतात. अशावेळी जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकांकडून विविध तक्रारी समोर आल्या. या तक्रारींमध्ये एन.पी.एस.च्या मागील ४ महिन्यांच्या थकीत हप्त्यांबद्दल तक्रार आली होती. यासोबत नियमित वेतनातील विलंब, वेतन देयक मिळवण्यासाठी कर्मचारी न मिळणे आणि एन.पी.एस. व जि.पी.एफ. च्या पावत्या न मिळणे याच्याही तक्रारी शिक्षकांनी केल्या होत्या.

या तक्रारींच्या आधारावर, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह वेतन पथक अधीक्षक कार्यालयात धडक दिली. यावेळी, आमदार सावरकर साहेब यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, वेतन पथक अधीक्षक राजेश तेलमोरे व इतर संबंधित कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली. कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

SHivaji Maharaj’s Waghnakh : वाघनखांसाठी ‘अजब बंगला’ सज्ज!

एन.पी.एस. संबंधित समस्येबाबत, आमदार सावरकर यांनी एन.आय.सी. (NIC) चे अधिकारी पवन जोशी यांना दूरध्वनीवरून संवाद साधला. तसेच मागील ४ महिन्यांचे एन.पी.एस.चे हफ्ते शिक्षकांच्या खात्यात का जमा झाले नाही याचा जाब विचारला. त्यांनी तात्काळ संध्याकाळपर्यंत एन.पी.एस. संबंधित कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना कडक शब्दात कामात सुधारणा करण्याची सूचना देण्यात आली.

CM Devendra Fadnavis : दिल्लीतील मराठी संमेलनाची जगात होईल चर्चा

यावेळी, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनीष गावंडे, उपाध्यक्ष अल्केश खेडकर, सहसचिव अविनाश मते, कैलास सुरळकर, गजानन सवडतकर, नरेंद्र चिमणकर, प्रफुल्ल होले, जिल्हाध्यक्ष वसीम मुजाहिद, मोहम्मद शोएबुद्दीन, फाईक आसिम यांसारखे पदाधिकारी उपस्थित होते.