Irregularities in ST bus purchase, claims BJP leader : एसटी बस खरेदीत अनियमितता, आमदार सावरकर यांचा दावा
Akola एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणण्याचा डाव भाजपने रचला आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे. यावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात शितयुद्ध सुरू असल्याचंही बोललं जात आहे. अशात आता भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी केलेल्या आरोपांनी लक्ष वेधले आहे. परिवहन महामंडळातर्फे बस गाड्यांच्या खरेदीत अनियमितता झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे प्रताप सरनाईक Shivsena Pratap Sarnaik परिवहन मंत्री Transport Minister आहेत. त्यांच्या अख्त्यारित असलेल्या परिवहन महामंडळात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. राज्य परिवहन महामंडळामार्फत (एसटी) १३१० बस गाड्यांच्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
Eknath Shinde : कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही!
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार सावरकर यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न क्रमांक २३ नुसार सरकारला विचारणा केली आहे. ‘एसटी महामंडळाच्या १३१० बस गाड्यांच्या खरेदी प्रक्रियेत जवळपास २ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, या खरेदीसाठी सरकारची मान्यता मिळाल्यानंतर परिवहन विभागाने ठेकेदारांच्या हितासाठी निविदेतील अटी व शर्तींमध्ये परस्पर बदल केला, हे खरे आहे काय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, तारांकित प्रश्न क्रमांक २४ नुसार “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी २०२५ मध्ये या खरेदी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. यासंदर्भात परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याची सत्यता काय?” असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
Randhir Sawarkar : ‘स्वारगेट’ नंतर आमदारांनी घेतली अकोला बस स्थानकांची झाडाझडती!
या प्रश्नांना उत्तर देताना राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “एसटी महामंडळामार्फत बस खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात चौकशी करून सदर प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.” आमदार सावरकर यांनी प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक त्या बस खरेदीसाठी योग्य नियोजन करण्याची मागणी सरकारकडे केली आहे