Breaking

MLA Randhir Sawarkar : खरीप हंगामात बियाणे-खतांचा काळाबाजार रोखा

Prevent black marketing of seeds and fertilizers : कृषी विभागाला आमदारांच्या सूचना; प्रगत शेतकऱ्यांचा सत्कार

Akola खरीप हंगामात बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करा, तसेच शेतकरी राजाची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या, अशा स्पष्ट सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी कृषी विभागाला दिल्या.

स्थानिक नियोजन भवनात अकोला तालुक्यातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत आमदार सावरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी प्रमुख उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रवींद्र ढवळे (बोरगाव मंजु), वैशाली बोर्डे (पळसो), नारायणराव पतंगे (कानशिवणी), ज्ञानदेव ढगे (चिखलगाव), शिवहरी गावंडे आणि दिनेश फोकमारे (एकलारा) यांचा समावेश होता.

Caste wise census : जातिनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक न्याय, हक्काची पुनर्स्थापना !

बैठकीत प्रमुख पिक क्षेत्र, बियाणे व खतांची उपलब्धता, संभाव्य पर्जन्यमान आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आमदार सावरकर म्हणाले की, मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असून, यंदा कापसाखालील क्षेत्र ३६००० हेक्टरपर्यंत वाढू शकते. कृषी विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि पूर्वानुभव लक्षात घेऊन नियोजन करावे.

त्यांनी सूचना दिल्या की, बियाणे व खतांची कृत्रिम टंचाई किंवा साठेबाजी होणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. सुद्धा, शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी आणि शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

Congress : नृसिंहाप्रमाणे ईव्हीएममधून नवा अवतार भाजपला नष्ट करेल !

बैठकीत “पीएम किसान सन्मान योजना”, “पिक विमा योजना”, “शेततळे योजना” अशा विविध योजनांचाही आढावा घेण्यात आला. सुमारे १५२९ शेतकऱ्यांचे ई-केवायसी अद्याप अपूर्ण असल्याने, कृषी सहाय्यकांनी गावपातळीवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या बैठकीस कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, बँक प्रतिनिधी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.