Vadettiwar’s statement is sign of anti-national mentality : भाजप आमदाराची टीका, पहलगाव घटनेवरील वादग्रस्त विधानाचा समाचार
Akola काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर यांनी सडकून टीका केली आहे. वडेट्टीवार यांचे वक्तव्य असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य करून केलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावर सावरकर म्हणाले, “काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं, हे वारंवार सिद्ध झालं आहे. तरीही वडेट्टीवार ‘दहशतवाद्याला जात-धर्म नसतो’ असे म्हणत कोणाला खूश करू पाहत आहेत?”
“पाकिस्तानमधील वृत्तपत्रे, नेते आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या कथनांशी काँग्रेस नेत्यांच्या विधानांची आशयातील समानता चिंताजनक आहे. काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांना ‘निर्दोष’ ठरवण्याचा प्रयत्न करतात का, असा प्रश्न आम्ही जनतेसमोर ठेवतो,” असेही सावरकर यांनी स्पष्ट केले.
Vijay Wadettiwar : अरे..! येथेही स्वतःचे मार्केटींग करताय का ? वडेट्टीवार संतापले..
वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा आणि त्यांच्या कृत्यांना झाकण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो, असे सावरकर म्हणाले. “हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचे उदाहरण आहे. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाने वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा,” असेही त्यांनी आवाहन केले.
MLA Randhir Sawarkar : जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार पोहोचला विधानसभेत!
“काँग्रेसचे नेते भारतीय जनतेच्या भावना दुखावून, त्यांच्या जखमांवर मीठ चोळून राजकारण करत आहेत. जनतेने हे विसरू नये,” असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला.
वडेट्टीवार काय म्हणाले?
दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असे विधान करून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाद ओढवून घेतला. त्यांच्यावर आता मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.