Congress warns of disconnecting power of Mahavitaran office : काँग्रेस आमदाराचा इशारा, तातडीने समस्या सोडविण्याची मागणी
Akola शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंगविरोधात आमदार अब्दुल सत्तार पठाण यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, ही समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा महावितरणच्या कार्यालयाची वीज खंडित करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी अधीक्षक अभियंता अजितपाल दिनोरे यांना दिला.
यावेळी मोहम्मद इरफान, डॉ. प्रशांत वानखडे, आकाश कवडे, जावेद जकारिया, महेंद्र गवई, सोहेल खान, रवी शिंदे, मोईन खान, कपिल रावदेव, मेहमूद खान यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
Eknath Shinde Shiv Sena : माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश, जबाबदारीही मिळाली!
मान्सूनपूर्व देखभालीची कामे सुरू असतानाच, शहरातील अनेक भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. परिणामी, पाणीपुरवठाही विस्कळीत होतो आहे. नळाद्वारे गोड्या पाण्याचा पुरवठा थांबत असून, रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सेवांनाही अघोषित भारनियमनाचा फटका बसतो आहे.
‘मेंटेनन्स’च्या नावाखाली होणाऱ्या भारनियमनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आ. पठाण म्हणाले, “वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी.”
हा प्रश्न केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून, संपूर्ण अकोला शहराचा आहे, असे स्पष्ट करत आ. पठाण यांनी महावितरण अधिकाऱ्यांना अघोषित भारनियमनाची झलक दाखवण्याचा इशारा दिला.
महावितरण कार्यालयाबाहेर युसुफ खान, अंकुश तायडे, मोहम्मद शारिक, राहुल सारवान, अभिजीत तवर, शेख अर्शद, साहिल शहा, सलीम अली, सोनू साहेब, प्रशांत प्रधान, तशवर पटेल, आसिफ खान, सोहेल खान पठाण, जिम्मी पठाण, अन्सार पठाण, मुजमील शेख (एम. एस) यांच्यासह शेकडो नागरिकांनी जमवाजमव केली होती.
Amravati NCP : राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जंबो’ कार्यकारिणी जाहीर
गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघात विजेचा लपंडाव सुरू आहे. हा एखाद्या भाजप प्रतिनिधीच्या इशाऱ्यावर होत असल्यास, “एक लोकप्रतिनिधी काय असतो ते दाखवून देऊ,” असा सज्जड इशारा आ. पठाण यांनी दिला.