Breaking

MLA Sajid Khan Pathan : अकोल्यात अवकाळी पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत

Unseasonal rains in Akola : आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक; सर्व यंत्रणांना समन्वय राखण्याच्या सूचना

Akola अकोल्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने शहराची अवस्था दयनीय झाली आहे. नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिमचे आ. साजिद खान पठाण यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले.

या बैठकीस मनपा आयुक्त सुनील लहाने, उपायुक्त गीता ठाकरे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम तसेच महावितरण, आरोग्य विभाग, मनपा यंत्रणा व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tribal Employees Federation : आदिवासी आश्रमशाळांच्या खासगीकरणाचा घाट

पठाण यांनी या बैठकीत सांगितले की, “आपल्याकडे यंत्रणा असूनही नागरिकांचे हाल होतात, हे दुःखद आहे. आपत्कालीन कक्षाचा क्रमांक सार्वजनिक करावा, झोननिहाय आणि प्रभागनिहाय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत. नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून पीडित नागरिकांना शासकीय मदत मिळवून द्यावी.”

Land Records Office employees on strike : तांत्रिक श्रेणी मिळावी म्हणून ४० वर्षांपासून संघर्ष!

शहरात विविध भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. मोहता मिल परिसरात झाड कोसळून चारचाकी वाहनावर पडल्याची घटना घडली, सुदैवाने महिला व बालक सुखरूप बचावले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काळात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने सज्ज राहावे, असेही त्यांनी सांगितले.

Constitution of India : संविधानाच्या ७५ कलमांवर ७५ तास चर्चा!

महावितरणच्या ढिसाळ नियोजनावरही आ. पठाण यांनी टीका केली. “जर कार्यात गती न आणल्यास आगामी अधिवेशनात मेंटेनन्सच्या नावाखाली खर्च झालेल्या निधीचा हिशोब मागण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला. रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांचे घरांचे टिनपत्रे उडाले, झाडे कोसळून नुकसान झाले. आ. पठाण यांनी या सर्व भागांचे तात्काळ पंचनामे करून संबंधितांना शासकीय मदत देण्याचे निर्देश दिले.