Breaking

MLA Sameer Kunawar : १७५ कोटी रुपयांचा खर्च, रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच ऐशीतैशी!

Potholes on roads built at a cost of Rs. 175 crore : नागरिक संतप्त, तीव्र आंदोलनाचा इशारा

Wardha हिंगणघाट नंदोरी, कोरा, खडसंगी या रस्त्याची दैनावस्था झाली होती. या मार्गासाठी चार वर्षांपूर्वी आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नांतून १७५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला. मात्र, अल्पावधीतच या मार्गाची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांनी संपात व्यक्त केला आहे. तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हिंगणघाट नंदोरी, कोरा, खडसंगी या मार्गासाठी शासनाने १७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्याचे काम पगारिया कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले होते. चार वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली; मात्र अद्यापही पूर्ण झाले नाही. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून, काम पूर्ण झालेल्या रस्त्यावर अल्पावधीतच ठिकठिकाणी खड्डे पडले. कंत्राटदाराकडून हे खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे.

MLA Sanjay Puram : दलिस वस्तीसाठी विशेष निधी द्या!

या रस्त्याचे काम अत्यंत सुमार दर्जाचे असल्यामुळे आठ महिन्यांमध्ये या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यांना पॅचेस लावण्याचे काम करावे लागले. पगारिया नामक कन्स्ट्रक्शन कंपनीला रस्त्याच्या कामाचा कोणत्याही अनुभव नाही. तरीही कोणत्या आधारावर या कंपनीच्या निविदा मंजूर करण्यात आल्या, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

या कामासंदर्भात ग्रामस्थांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किशोर दिघे यांच्याकडे रस्त्याची माहिती दिली असता त्यांनी रस्त्याची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे व उपविभागीय अभियंता सतीश धमाणे यांना घटनास्थळी बोलावले.

Mahayuti Government : ग्रामपंचायतींची गृह, पाणी कर वसुली ५० कोटींवर!

त्यांना मार्गाची स्थिती दाखवीत चांगलेच धारेवर धरत कानउघाडणी केली. यावेळी अभियंत्यांनी सरकारमधील वेगवेगळ्या नेत्यांची नावे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. नागरिकांनी अधिकाऱ्यांना भर रस्त्यावर प्रश्नांचा भडिमार केला. संबंधित ठेकेदारांना तत्काळ या रस्त्याचे उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यास सांगा, अन्यथा आठवडाभरात या रस्त्यावर गावातील लहान-मोठ्या नागरिकांना सोबत घेऊन नंदोरी चौकात तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.