Breaking

MLA Sanjay Gaikwad : आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

Development works were also reviewed in the review meeting : आढावा बैठकीत विकास कामांचाही आढावा

Buldhana मोताळा तालुक्यात वॉटर ग्रीडच्या धर्तीवर तालुक्यातील धरणे जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. याअनुषंगाने शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या कामांसह विविध विकास कामांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे आमदार महोदय जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

हरमोड सिंचन तलावाची उंची वाढवून मोहेगाव नदीवर बांध टाकून पावसाचे पाणी हरमोड धरणात लिफ्ट करण्यात यावे. तसेच पलढग धरणाचे पावसाळ्यातील अेाव्हर फ्लो होणारे ६० टक्के पाणी कोथळी मार्गे नळगंगा धरणात वळती करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. सोबतच सांडव्यामध्ये बांध टाकून ४० टक्के पाणी हे धामणगाव देशमुख येथील धरणात लिफ्ट करणे. गिरडा स्टोरेज तलावाची निर्मिती करणे यावरही यावेळी चर्चा झाली.

Khamgaon Police : आठवडी बाजारातच चुलत भावाचा खून !

नळगंगा धरण हे मोताळा तालुक्यात असून त्याचा फायदा मात्र पुढच्या तालुक्यांना होतो. त्यामुळे मोताळ्याला लाभ व्हावा. या दृष्टीकोनातून किन्होळा शिवारास शासनाच्या १८५ हेक्टरच्या ई-क्लास जमिनीवर पाणी स्टोरेज निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे. हा मुद्दाही प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला.

बुलढाणा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सभागृह बांधकामासाठी सहकार विभागाच्या भूविकास बँकेची पडीक जागा हस्तांतरित केली जावी. बुलढाणा पालिकेकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील जागा उद्यान व चौपाटीसाठी हस्तांतरित करण्यात यावी. या विषयावर चर्चा करण्यात आली. येळगाव पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने तीन टप्पे मंजूर करण्यात यावे, असेही यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

MP Amar Kale : राष्ट्रसंतांच्या विचारांची कास धरावी !

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पालिकेसह, महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बुलढाणा आणि मोताळा तालुक्यांतील विविध विकास कामांना मान्यता द्यावी. ही कामे वेगाने व तत्परतेने मार्गी लावण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. या बैठकीत विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता घेत अनुषंगीक कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.