Amravati city in the grip of drugs : नशेच्या गर्तेत जाण्याच्या उंबरठ्यावर; मुख्यमंत्री आयुक्तांना विचारणार जाब
Amravati अमरावती शहरात अंमली पदार्थांची तस्करी चिंताजनक पातळीवर पोहोचली असून, मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे रॅकेट सक्रिय असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत पावसाळी अधिवेशनात आमदार संजय खोडके यांनी लक्षवेधी सूचना मांडून यावर तीव्र चिंता व्यक्त केली.
“अमरावतीसारख्या लहान शहरात एका वर्षात तब्बल ३१ अंमली पदार्थ तस्करीची प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे ही बहुतांश प्रकरणे एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहेत, यावरूनच यामागे साखळी पद्धतीचे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसते. आरोपींना लवकरच जामीन मिळतो आणि ते पुन्हा तस्करीत गुंततात. यात आता अल्पवयीन मुलांचाही वापर करून हॉटेल्स, महाविद्यालयांपर्यंत ड्रग्स पोहोचवले जात असल्याचे चित्र आहे,” असं खोडके म्हणाले.
खोडके यांनी पोलिसांवरही टीका करताना म्हटले की, “शहर छोटे असून कोण काय करतो, हे पोलिसांना माहिती असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पोलिसांकडूनच अशा रॅकेटला अभय मिळते आहे, अशी शंका निर्माण होते.”
या गंभीर मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी स्वतः अमरावती पोलीस आयुक्तांशी याबाबत चर्चा करून कठोर कारवाईसाठी निर्देश देईन. विशेषतः अल्पवयीन मुलांमार्फत होणाऱ्या तस्करीमागे कोण आहे, हे शोधून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.”
Neelam Gorhe : निलम गोऱ्हेंची ठाकरे ब्रँडवर टीका, संदीप देशपांडेंचा फुटकळ असा उल्लेख !
खोडके म्हणाले की, “जर हे असेच सुरू राहिले, तर अमरावती शहर नशेच्या गर्तेत जाईल व नव्या पिढीचा विनाश अटळ ठरेल. त्यामुळे राज्य शासनाने या विरोधात तातडीने कडक धोरण राबवावे,” अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.