Breaking

MLA Shweta Mahale : स्टार्टअप चळवळ ही भारताच्या आर्थिक सुवर्णयुगाची नांदी

The startup movement is the beginning of India’s economic golden age : महिला आमदाराला विश्वास, मेक इन महाराष्ट्रमुळे उद्योग क्षेत्रात महिलांचे नेतृत्व बळकट

Buldhana “एकेकाळी ‘सोन्याचा धूर निघणारा’ भारत पुन्हा आर्थिक महासत्ता बनण्यासाठी सज्ज होत आहे, आणि त्यासाठी ‘स्टार्टअप’ ही चळवळ लोकाभिमुख बनवणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी राष्ट्रीय नवोद्योजक समिट आणि वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम २०२५ मध्ये मुंबई येथे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडिया आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेक इन महाराष्ट्र, इज ऑफ डुइंग बिझनेस या धोरणांमुळे राज्यात उद्योगासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून, महाराष्ट्राने दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये १६ लाख कोटींचे सामंजस्य करार करत देशात अव्वल स्थान मिळवले, हे अत्यंत गौरवाचे आहे, असे महाले यांनी सांगितले.

Floods in Mumbai : मुंबईत राज्य सरकार आणि प्रशासन राजजी गटारगंगा, महायुतीने मुंबई बुडवली !

महाराष्ट्रातील २८,००० स्टार्टअप्सपैकी ५०% पेक्षा जास्त महिलांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, महिलांनी राष्ट्रनिर्मितीमध्ये पुढाकार घ्यावा, हेच आजच्या नवभारताचे लक्षण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महिलांचे आर्थिक स्वावलंबन हेच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाचे मूळ आहे, असेही त्या म्हणाल्या.

Expansion of sports facilities : ऑलिम्पिक विजेते घडवण्याचे ध्येय! मुनगंटीवारांची ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’कडे ठाम वाटचाल

बुलढाणा, अकोला, वाशिमसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर उद्योजकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. विदर्भातील तरुणांमध्ये नवोन्मेषाची क्षमता, उद्योगासाठी आवश्यक धाडस, आणि संधी ओळखण्याची तयारी आहे, असे गौरवोद्गार आमदार महाले यांनी काढले. “गावखेड्यापर्यंत स्टार्टअप चळवळ पोहोचवून विदर्भ स्टार्टअप क्रांतीचा पुढचा केंद्रबिंदू बनेल,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

“ग्रामीण भागातील उद्योजकांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी सहज मिळाव्यात यासाठी ‘एक खिडकी योजना’ अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल,” असे आश्वासन आमदार महाले यांनी दिले. केवळ वैयक्तिक प्रगती न करता जिल्हा, राज्य आणि राष्ट्राच्या आर्थिक विकासात भागीदारी करण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले.

Irrigation Department : खारपाणपट्ट्यांना सिंचनाचा दिलासा; ४२६ कि.मी. कालव्याचे सर्वेक्षण पूर्ण

आमदार श्वेता महाले यांचा हा दृष्टिकोन आणि उपस्थिती नवोद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या वक्तव्याने राज्य शासनाच्या उद्योगाभिमुख धोरणांना सक्रिय राजकीय पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले. नवोदित उद्योजकांना प्रेरणा, दिशा आणि धोरणात्मक विश्वास देणारे नेतृत्व म्हणून त्यांची छाप कार्यक्रमात जाणवली.