Agricultural assistants warn of strike : आमदार सिद्धार्थ खरात यांची आंदोलनस्थळी भेट
Buldhana कृषी सहायकांच्या पदोन्नतीचा गुंता तातडीने सोडवावा, तसेच विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात. या मागण्यांसाठी मेहकरात कृषी सहायक संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला आता गती मिळाली आहे. १५ मेपासून कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा कृषी सहायकांनी दिला आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कृषी विभागात सध्या नवीन आकृतिबंध (कॅडर स्ट्रक्चर) तयार करण्यात येत आहे. मात्र, या प्रक्रियेत कृषी सहायकांच्या पदोन्नतीसंबंधित अडचणी निर्माण झाल्या असून, संघटनेला विश्वासात न घेता निर्णय होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आकृतिबंध अंतिम करताना कृषी सहायक संघटनेला विश्वासात घेण्याची मागणी जोर धरत आहे.
संघटनेकडून दिलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या आहेत:
सहायक व कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४:१ ठेवण्यात यावे
पदाचे नामांतर करून “सहायक कृषी अधिकारी” करण्यात यावे
प्रत्येक कृषी सहाय्यकाला लॅपटॉप आणि मदतनीस देण्यात यावा
ऑनलाईन कामांचा वाढता भार लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे
बुधवारी आमदार सिद्धार्थ खरात यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कृषी सहाय्यकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांनी सर्व मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “कृषी सहायक हा शेती आणि शेतकऱ्यांचा खरा साथीदार आहे. त्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने गंभीरतेने लक्ष द्यावे.”
Congress protest : हक्काच्या निधीवर गदा; काँग्रेसचा महायुतीविरोधात मोर्चा
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख निंबा पांडव, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दत्ता घनवट, माजी जि.प. सदस्य संजय वडतकर, शहराध्यक्ष किशोर गारोळे, ॲड. संदीप गवई, गणेश सवडतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी सहायक संघटनेने आंदोलन विविध टप्प्यांमध्ये राबवण्याचे ठरवले आहे. १५ मेपासून कामबंद आंदोलन हा पुढचा टप्पा असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.