Breaking

MLA Siddharth Kharat : शेतकऱ्यांना खासगी फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करा

Free the farmers from private finance companies : सहकार दिंडीचे बुलढाण्यात जल्लोषात स्वागत

Buldhana सहकार चळवळ बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक राष्ट्रीयकृत बँकांच्या जाचक अटींमुळे त्रस्त आहेत. एकीकडे बँका त्रास देतात आणि दुसरीकडे खासगी फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांभवती फास आवळला आहे. यातून शेतकरी व सर्वसामान्यांची सुटका करणे, ही सहकारी संस्था व बँकांची जबाबदारी आहे, अशी अपेक्षा आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासन सहकार विभाग व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. नागपूरहून निघालेल्या दिंडीचे बुलढाणा जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मेहकर येथील गजानन महाराज संस्थानमध्ये हा कार्यक्रम झाला. काका कोयटे यांच्या नेतृत्वात स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार खरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव होते.

Food and drugs department : अपुऱ्या धान्याचा घोळ थांबवा!

शेतकरी, सर्व सामान्य नागरिकांना वेळेवर कर्ज मिळत नाही. म्हणून इच्छा नसताना खाजगी फायनान्स कंपन्यानकडे जावे लागते. त्या कंपन्या कर्ज देऊन अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करतात. पठाणी वसूली करतात. जनतेची नुसती लूट सुरु आहे. त्यामुळे पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेणे गरजेचे आहे. मध्यम शेतकरी, छोटे व्यवसायिक त्यांची क्षमता तपासून मदत करावी, असंही खरात म्हणाले.

Nagpur municipal corporation : मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले!

यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक खरात, माजी आमदार डॉ संजय रायमुलकर, पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे,सुदर्शन भालेराव, प्रविण फडणवीस, माधवराव जाधव,गितेशचंद्र साबळे,गजानन फाटे सुदेशजी लोढे प्रमोदबापू देशमुख,सागर पाटील, ॲड. आकाश घोडे, ॲड, संदिप गवई, ऋषिकेश जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.