Breaking

MLA Siddharth Kharat : बुलढाण्यात महाविकास आघाडीचाच डंका, आमदाराला विश्वास

MLA confident about Mahavikas Aghadi’s win in Buldhana district : खरात म्हणतात, मेहकरच्या परिवर्तनाचे वारे जिल्हाभर

Buldhana “सामान्य जनतेसाठी काम हीच आमची निवडणूक तयारी आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच आघाडीवर असेल,” असा ठाम विश्वास आ. सिद्धार्थ खरात यांनी आज व्यक्त केला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सहा महिन्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

1989 मध्ये मंजूर झालेल्या मेहकर एमआयडीसी प्रकल्पातील 53 एकर जमीन अतिक्रमणमुक्त करून खरात यांनी मोठा पायाभूत निर्णय घेतला. या जागेवर नव्याने 15 प्लॉट उद्योगांसाठी खुले करण्यात आले असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याशिवाय अधिक 500 एकर जमीन मागणीसाठी उद्योग विभाग व महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून 200 एकर जमीन भूसंपादन प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Jyoti Mete : शिवसंग्रामच्या बैठकीत निवडणूक तयारीचे रणशिंग

पेनटाकळी मध्यम प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 401 नागरिकांना प्लॉट वाटपाच्या कामाला यश मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. हा विषय केवळ विकासाचा नाही तर सामाजिक ऐक्य जपणारा आहे, असेही ते म्हणाले.

सद्यस्थितीत सोयाबीनच्या अल्प भावामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यांनी पर्यायी पीक पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी त्यांनी मक्का, हळद आणि सिताफळ, संत्रा यासारख्या फळबागांकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन त्यांनी केले. “शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व पणन विभागाशी समन्वय साधून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

Vijayraj Shinde : भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे, कामाला लागा

शहरातील अतिक्रमण हटवल्यानंतर गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी बसस्थानक समोरील 300 प्लॉट्सचे वितरण लवकरच होणार असल्याचे खरात यांनी सांगितले. त्यासाठीची निविदा अंतिम टप्प्यात आहे.