Breaking

Mla Sidhharth Kharat : स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यावर फोकस करा!

Focus on winning local body elections : निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या आमदारांच्या सूचना

Buldhana येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. चांगले काम करावे. सर्वच्या सर्व जागा स्वबळावर जिंकायच्या आहेत. त्यासाठी जोमाने काम करा, अशा सूचना आमदार सिद्धार्थ खरात यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

मेहकर येथील हॉटेल केव्ही प्राईड येथे पदाधिकारी कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी तालुका प्रमुख, शाखा प्रमुख सर्व संपर्क प्रमुखांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांनी ग्रामीण स्तरावर जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. त्यांच्या समस्या सोडवाव्या. गावातील विकास कामांचे प्रस्ताव द्यावे. गोरगरीबांच्या समस्या सोडवाव्या. अधिकारी कर्मचारी यांच्याकडून जनतेची कामे करून घ्या त्यात कोणी अडथळा आणत असेल तर त्याला शिवसेना स्टाईल चोप द्या, असंही खरात म्हणाले.

PM Housing Scheme : महागाई आभाळात, घरकुलासाठी मात्र फक्त सव्वालाख!

यावेळी सर्व संपर्क प्रमुखांनी मतदारसंघात गावा गावात जाऊन कार्यकर्ते जोडणे आवश्यक आहेत. त्यांच्यासोबत संबंधित उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख सर्कल प्रमुख यांना सोबत घ्यावे. प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठक आयोजित करणे आवश्यक आहे. बैठकीसाठी स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख (पुरुष-महिला), युवासेना शाखा युवा पदाधिकारी यांना सोबत घ्यावे. अशा सुचना त्यांनी केल्या.

Union Budget 2025 : मध्यमवर्गीयांच्या माफक अपेक्षा पूर्ण होतील का?

या वेळी उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, दिपक मापारी, विनायक मापारी रमेश बापू देशमुख, किसन पाटिल, नारायण बळी, मेहकर शहर अध्यक्ष किशोर भाऊ गारोळे, ॲड आकाश घोडे, गजानन जाधव, विजय मोरे, योगेश कंकाळ, जीवन घायाळ, ऋषिकेश जगताप, परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत मादनकर, विजय लोखंडे,समाधान ठाकरे, गजानन राठोड, महादेव उर्फ बाळूभाऊ पारवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.