Breaking

MLA Sudhakar Adbale : दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा तापणार?

MLAs will protest against the Board of Education : आमदार अडबालेच कार्यालयासमोर आंदोलन करणार

Nagpur दहावी, बारावी परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आस्थापनेतील केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक – उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. यामुळे शिक्षक वर्तुळात नाराजीचा सूर आहे. याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले हे आंदोलनाच्या पावित्र्यात आले आहेत. १ फेब्रुवारी रोजी ते स्वत: बोर्डासमोर आंदोलन करणार आहेत.

एरवी आमदार झाल्यानंतर आंदोलनाच्या भानगडीत न पडता संस्थात्मक पातळीवरील कामे पूर्ण करण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र अडबाले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने शाळा, शिक्षकांची तारांबळ उडेल. सोबतच बाहेरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्राच्या भौगोलिक परिस्थितीची, स्थानिक अडचणींची व आवश्यकतेची पूर्ण माहिती नसल्यामुळे परीक्षा व्यवस्थापनात अडथळा निर्माण होईल.

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेनेचे वाशिम बसस्थानकात आंदोलन

एकीकडे शिक्षण विभाग ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सन्मान करतो तर दुसरीकडे सदर निर्णयावरून राज्यमंडळाचा राज्यातील शिक्षकांवर अविश्वास दिसतो आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे, अशी भूमिका अडबाले यांनी मांडली आहे. त्यांच्या साथीला माजी आमदार व्ही.यू.डायगव्हाणे हेदेखील राहणार आहेत.

Collector of Buldhana : ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटेल

 

या धरणे आंदोलनात विदर्भ ज्‍युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, राज्‍य शिक्षक मंडळ, विभागीय अनु. आ. आश्रमशाळा कर्म. संस्‍कृती संघटना व इतर समविचारी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. आमदारच आंदोलनात उतरत असल्याने शिक्षकांना बोर्ड दिलासा देणार का याकडे शिक्षक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.