व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण MLC Dhiraj LIngade : सरकार लाडक्या बहिणींना विसरले!

MLC Dhiraj LIngade : सरकार लाडक्या बहिणींना विसरले!

 

The government has forgotten the promise made to Ladki Bahin : विधानपरिषदेतील चर्चेत आमदार लिंगाडे यांची टीका

Buldhana निवडणुकीचा प्रचार करताना लाडकी बहीण योजनेचे मानधन २१०० रुपये करण्यात येईल असे सरकारने सांगितले. त्यानंतर निवडणुका झाल्या, सरकार आले, पण अद्याप पैसे वाढलेले नाहीत. आजही महिलांच्या खात्यात १५०० रुपयेच पडले आहेत. त्यामुळे सरकार आपल्या लाडक्या बहिणांना विसरले आहे, अशी टीका आमदार धीरज लिंगाडे यांनी विधानपरिषदेत केली.

सभागृहात उपस्थित चर्चेदरम्यान लिंगाडे यांनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले. लाडकी बहीण योजना, जुनी पेन्शन योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प आणि एसटी बससेवा यासारख्या विषयांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली.

महायुती सरकारने १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही लाभार्थींना त्याचा फायदा झालेला नाही. यावरून काम झाल्यावर सरकार बहिणींना विसरले आहे, असा आरोप त्यांनी केला.

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या मुलांचे उपोषण; चिखलीत अनोखे आंदोलन

गोरगरीबांच्या प्रवासासाठी महत्त्वाची असलेली एसटी बससेवा अर्थसंकल्पात दुर्लक्षित का? अशी विचारणा करत त्यांनी राज्य सरकारला उत्तर मागितले. २००५ पूर्वी नोकरीला लागलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही, असे सांगत त्यांनी सरकारला ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

Anil Deshmukh : सरकारनेच निवडणुका लांबणीवर टाकल्या!

उत्पन्नवाढ आणि स्थैर्यासाठी शिक्षक आश्वासित प्रगती योजनेच्या (एसीपी) प्रतिक्षेत आहेत. मात्र, विलंबामुळे काही शिक्षकांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे, ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब असल्याचे लिंगाडे म्हणाले. सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या नदीजोड प्रकल्पाची सरकारने घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात ही योजना अद्याप कागदावरच आहे, असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

शेतकरी आत्महत्यांपासून शिक्षकांच्या समस्या आणि सामान्य जनतेच्या योजनांपर्यंत विविध प्रश्न उपस्थित करत आमदार धीरज लिंगाडे यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

error: Content is protected !!