White paper to be prepared for the development of Vidarbha : शपथ घेतल्यानंतर आमदार संजय खोडके प्रथमच अमरावतीत
Amravati ३५ वर्षांचा विधिमंडळ आणि मंत्रालयीन कामाचा अनुभव वापरून विदर्भाच्या विकासासाठी कार्य करणार आहे. सामाजिक, आर्थिक आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून विदर्भाच्या प्रगतीसाठी श्वेतपत्रिका तयार करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार संजय खोडके यांनी शनिवारी अमरावतीत केले.
विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचे प्रथमच अमरावतीत आगमन झाले. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाने विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली आहे. हा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मेहनतीचा सन्मान आहे. अमरावतीतील सहकारी, स्नेहीजन आणि जनतेचे प्रेम व पाठबळ माझ्या सोबत आहे, असंही ते म्हणाले.
Mahayuti Government : मोर्शीतील मत्स्यविज्ञान महाविद्यालयासाठी १६५ कोटी मंजूर
आमदार झाल्यानंतर संजय खोडके शनिवारी सकाळी पहिल्यांदाच अमरावतीत दाखल झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गुलालाची उधळण, बँड पथक आणि मोठ्या जल्लोषात त्यांचे आगमन झाले. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने भव्य पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपस्थित होते. आपल्या भाषणात संजय खोडके म्हणाले, “विकासकामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून, विदर्भाच्या मागण्यांसाठी ठाम भूमिका मांडणार आहे. राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”
CM Devendra Fadnavis : आरोग्य सेवेतील ‘त्या’ 680 पदांची सरळसेवेने भरती
नागपुरात अधिवेशन
दुसरीकडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दोन दिवसीय तिसरे अधिवेशन नागपूर येथील आमदार निवासात आयोजित करण्यात आले आहे. रविवार, २३ मार्चपासून या अधिवेशनाला सुरुवात होईल, तर सोमवारी, २४ मार्च रोजी खुले अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विदर्भाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर सखोल चर्चा होणार असून, विदर्भ राज्याच्या स्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवली जाईल. विदर्भातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.








