Breaking

MNREGA workers : वेतन देता येत नसेल तर भीक द्या’; मनरेगा कामगारांच्या भावनांचा उद्रेक

BHIK MANGO agitation against state government : तिवसात राज्य सरकारच्या विरोधात भीक मांगो आंदोलन

Amravati राज्यात १ मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक स्तरावर कामगार दिन साजरा होत असतानाच तिवसा येथील पंचायत समिती कार्यालयावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कुशल व अकुशल कामगारांनी “भीक मागो” आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. “देयक नसेल, तर भीक तरी द्या” अशा घोषणा देत कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या.

या आंदोलनाचे आयोजन माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. तालुक्यातील शेकडो मनरेगा कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते.

Crime in Akola : पत्नी व सावत्र मुलीचा गळा आवळून खून केला, नंतर मृतदेहांना घास भरवला

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रितेश पांडव, तिवसा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष लुकेश केने, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख, प्रफुल्ल देशमुख, नगरसेवक अमर वानखडे, योगेश वानखडे, किसन मुंदाने, साहेबराव ठाकरे, युवक कार्याध्यक्ष जसबीर ठाकूर, नितीन अर्डक, सुनील उतखेडे, दिलीप वानखडे, गौरव चौधरी, अक्षय पवार, वैभव ढवळे, अनिकेत तालन, केशव चौधरी, सूरज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

तिवसा तालुक्यातील अनेक मजुरांनी मागील काही दिवसांपासून मनरेगाअंतर्गत विविध विभागांमार्फत काम सुरू केले आहे. मात्र, काम करूनही त्यांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून, काही वेळा अधिकाऱ्यांशी वादही झाला. तरीदेखील समस्या सुटत नसल्यामुळे या तीव्र आंदोलनाचा मार्ग निवडण्यात आला.

Chief Minister’s Help Desk : गरजू रुग्णांना आता शहरातच मिळणार मदतीची माहिती

या आंदोलनात वृषभ वानरे, श्रीकांत माहोरे, सूरज चौधरी, प्रशांत प्रधान, सूरज धुमनखेडे, दीपक पावडे, शुभम बोके, गजानन तडस यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.