‘No response from MNS, Aditya says This sentiment in the interest of Maharashtra : मनसेकडून ‘नो रिस्पॉन्स’, आदित्य ठाकरे म्हणतात ‘हे सेंटिंमेट महाराष्ट्र हिताचं’
Mumbai : मराठीचा मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे तब्बल 19 वर्षानंतर जाहीर कार्यक्रमात एका व्यासपीठावर आले. विजयी मेळाव्या नंतर दोन्ही पक्षांची युती करतील काय? हा सध्या राज्यातला मोठा चर्चेचा विषय आहे. पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी हे सेंटिंमेट महाराष्ट्र हिताचं असल्याचे म्हणले आहे. तर मनसे कडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद नसल्यामुळे युतीबाबत काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. मनसेचे महा शिबिर नाशिक मध्ये सुरू होत आहे त्यानंतर यावर निर्णय अपेक्षित असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
मुंबईमध्ये पाच जुलैला ठाकरे बंधुंचा एकत्रित मराठी भाषा विजयी मेळावा पार पडला. मेळाव्याला ठाकरे आणि मनसे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांसह सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे पुन्हा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चांना बळ मिळाल. पण राज ठाकरेंनी नेत्यांना युतीविषयी भूमिका न मांडण्याच्या सूचना दिल्याने संभ्रम निर्माण होत आहे. आता युतीबाबत शिवसेना ठाकरे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत आणि पण भेटीची घोषणा लवकर व्हावी यावर भर दिला आहे.
Buldhana Dhad Grampanchayat : धाड ग्रामपंचायतमध्ये अनियमितता; माजी सरपंचांचा आरोप
आदित्य ठाकरे यांनी युती संदर्भात प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात युतीला पोषक वातावरण आहे, दोन्ही भावांनी एकत्र यावे यासाठी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आग्रही आहेत. यावर सविस्तर चर्चा होईल, पण हे सेंटिमेंट महाराष्ट्र हिताचं आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल. उद्धव ठाकरे हे सुद्धा सुरुवातीपासून अशाच आशयाचे वक्तव्य करत आहेत. ठाकरे गट सकारात्मक दिसत आहेत. मात्र राज ठाकरेंनी अद्याप सस्पेन्स कायम ठेवला आहे नाशिक येथे मनसेचे महा शिबिर होत आहे त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.