Democracy or Plunder? The Mysterious, Burning Reality Behind the Elections Drama : मतदारांच्या शांततेतून निघालेली लोकशाहीची अंत्ययात्रा आहे
Nagpur : लोकशाहीचा पाया म्हणजे विश्र्वास. हा विश्र्वास जर उडाला, तर राज्यघटना, निवडणूक आयोग, संसदेची शोभा सगळं.. सगळं.. बाहुला-बाहुलीचा खेळ ठरतो. आज आपण ज्या कुंपणावर उभे आहोत, तेथे निवडणुकीचं नाव घेताच ‘खरंच माझं मत मोजलं जातंय का’, असा प्रश्र्न मतदाराच्या मनात न दाटला तर नवलंच.
आज निवडणूक आयोगाचं रुप हे संविधानातील स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्थेचं राहिलेलं नाही. ती संस्था सत्ता टिकवण्यासाठी झटणाऱ्या राजकीय शक्तींच्या छायेखाली वाकली आहे. ‘सीसीटीव्ही फुटेज प्रायव्हेट आहेत’, हे निवडणूक आयोगानं सांगणं म्हणजे सरळ सरळ त्यांच्या पारदर्शतकेवर पडदा टाकणं होय. मतदार कोण आहेत, हे सर्वांना माहिती असताना मतमोजणीच्या प्रक्रियेला गुढतेचं लेपण लावणं, ही फक्त लोकशाही चेष्टा नाही, तर लोकशाहीची हत्या आहे.
MNS office bearers’ gathering : निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा स्फोटक आरोप, म्हणाले…
लोकशाहीच्या नावाखाली आज जी व्यवस्थेची थट्टा सुरू आहे, ती नुसती निवडणूक प्रक्रियेतील फसवणूक नाही, तर भविष्यातील राष्ट्राची लाचारी घडवणारी प्रक्रिया आहे. मतमोजणीचे आकडे, ईव्हीएमचे घोळ, मतदार याद्यांतील गायब नावे, प्रायव्हसीच्या नावाखाली लपवलेले पुरावे, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की तयार होतं ते निवडणुकीचं नाटक.
समाजमन जर पेटून उठलं नाही, लोकांचं रक्त आताही खवळलं नाही, तर निवडणूक नावाची ही व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्या हाती काय उरणार, हा प्रश्न आज प्रत्येकाला पडला पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. हीच परिस्थिती येणाऱ्या पिढ्यांसाठी घातक ठरणार आहे. लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज आजारी आहे. अन् ते इतकंही आजाही पडू नये की खाटल्यावर जावं. या आजाराचं निदान म्हणजे जागृती.
मतांची चोरी होतेय, ही बोंब देशभर आहे. मतांच्या चोरीच्या पोस्ट सोशल मिडियावर जोमाने व्हायरल होतात. पण निवडणुकीत मतदान केंद्रांवर फक्त ५० टक्केच लोक पोहोचतात. उर्वरीत सुट्यांचा आनंद लुटायला जातात, आपली हिच निष्क्रियता लोकशाहीची खरी व्यथा आहे. आज आपण गप्प राहिलो तर उद्या मतदारसंख्या वाढेल, पण त्या मतांना अर्थ उरेल का, याची हमी देता येणार नाही. आज आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर मत देण्याचा हक्क एक दिवस केवळ आणि केवळ डिजिटल भास ठरेल.
Uddhav – Raj Thackeray meeting : भेटी मोजताहेत, आता तर मीही कंटाळलो, राज ठाकरेंचा टोला !
लोकशाहीला आज गरज आहे ती संघर्षाची अन् जागृतीची. ज्या क्षणी मतदार गप्प राहतो, त्या क्षणी सत्ताधारी मस्तवाल होतात, हीच खरी शोकांतिका आहे. ही मतदारांच्या शांततेतून निघालेली लोकशाहीची अंत्ययात्रा आहे, असे म्हटल्यात अतिशयोक्ती ठरू नये.
 
             
		
