Breaking

Modi Government : संपूर्ण जगाला ‘सिंदूर’चा अर्थ आणि महत्व समजलं !

Amit Shah said the whole world understood the meaning and importance of ‘Sindoor’ : माता भगिनींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना घरात घुसून मारलं

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आला आहे. २०४७ मध्ये आपण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ, हा विश्वास आहे. कारण हा बदललेला भारत आहे, जो आमच्या माता भगीणींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना त्यांच्या घरात घुसून मारतो. आज संपूर्ण जगाला ‘सिंदूर’ या शब्दाचा अर्थ कळला आणि त्याचे महत्व समजले. आपरेशन सिंदूरमुळे आपल्या माता भगीणींची मान गर्वाने उंच झाली, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सरकार मंत्री अमित शाह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या ११ वर्षांचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरांत लिहिला जाईल. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक वर्ष प्रलंबित ऐतिहासिक निर्णय या कार्यकाळात घेण्यात आले, जे यापूर्वी कोणतेही सरकार घेऊ शकले नव्हते. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आता कोणताही देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही, असेही अमित शाह म्हणाले.

Farmers in trouble : पंचनाम्याचे सोपस्कार बाजुला ठेवा अन् एकरी २० हजाराची मदत द्या !

माधवबाग येथे काल (२७ मे) श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा जयंती महोत्सव भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यासाठी आले असताना अमित शाह यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. या महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विभानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. विशेष पुजनाने महोत्सवाची सुरूवात झाली. त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष संध्या पुरेचा आणि सरफोजी राजे बोसले संस्था यांच्या प्रस्तुती सादर करण्यात आल्या. श्री लक्ष्मी नारायण मंदिर आणि माधवबाग चॅरीटी यांच्या विश्वस्थ मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Maharashtra Cabinet : राज्याचे मंत्रिमंडळ अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न !

माधवबाग परिवाराने १५० वर्ष समाजसेवेचे कार्य अविरत केल्याबद्दल अमित शाह यांनी माधवबाग परिवाराचे अभिनंदन केले. जेव्हा ही संस्था २०० वर्ष पूर्ण करेल, तेव्हा येथे आपल्या मातृभाषेचे प्रशिक्षण केंद्र असावे. गीता, उपनिषदं आणि वेदांचं शिक्षण येथे मिळावं आणि आरोग्य सेवादेखील मिळावी, अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली.