Nehru had called a special session and given answers to the people said Congress Leader Vijay Wadettiwar : लोकशाहीत जनतेला आणि विरोधी पक्षांना प्रश्न विचारण्याचा अधिकार
Nagpur : भारताला आजच नाही तर सन १९६२, १९६५ आणि १९७१ मध्ये युद्धात मोठे विजय मिळालेले आहेत. युद्धादरम्यान आणि नंतरही पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यावेळी त्यांनी विशेष अधिवेशन बोलावून लोकांना उत्तरे दिली. मात्र आता उत्तरे मिळत नाहीत. देशात लोकशाही आहे आणि यामध्ये लोकांना आणि विरोधी पक्षांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात आज (२१ मे) वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारले तर सैन्याचा अपमान केला, असं म्हटलं जातं. पुलवामात २५० किलो आरडीएक्स कुठून आला, कुणी आणला, आणणारे कोण होते, याचा शोध अद्यापही घेतला जात नाही. याला काय म्हणावं? पहलगाममध्ये चार अतिरेक्यांचे स्केचेस दाखवले गेले. पण ते कुठे लपले आहेत, याचा शोध का घेतला जात नाहीये?
Gadchiroli Industrial Revolution : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांतीच्या नावावर लूट !
आपण सिमेपार लढाई केली. मात्र भारतात लपलेले अतिरेकी आपल्या हातात का लागत नाहीत? त्यांचा शोध का घेतला जात नाही, असं विचारलं तर सैनिकांचा अपमान केला, देशद्रोही असल्याचे आरोप आमच्यावर केले जातात. देशाचा सर्वाधिक अपमान करणारे कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याचा सन्मान आणि हिंमत वाढवण्यासाठी काँग्रेसकडून रॅली काढण्यात येत आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
Damage to paddy and orchards : शेतकरी मेला तरी चालेल, पण रस्ते तेवढे झाले पाहिजे !
पहलगाव येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी कारवाई करणार, हे पाकिस्तानला कळवलं होतं. याचा काय अर्थ घ्यायचा? पाकिस्तानला सांगून तेथून अतिरेकी काढून टाका, सैन्य काढून टाका, मग भारत हल्ले करेल. असा प्रकार होता का, असा प्रश्न आम्ही केला तर त्याच चूक काय केलं? शत्रुंना सांगून हल्ला करणे योग्य आहे का? हे देशप्रेमाचे लक्षण आहे का, असे प्रश्न करत या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचाव्या, यासाठी रॅली काढत आहो, असेही वडेट्टीवार म्हणाले.