PM Modi’s appeal to Japanese industries : पंतप्रधान मोदींचे जपानी उद्योगांना आवाहन
Tokyo : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्याची सुरुवात भारत-जपान आर्थिक शिखर परिषदेत भाषण करून केली. या वेळी त्यांनी जपानी उद्योगांना भारतात गुंतवणूक वाढवण्याचे आणि *‘मेक इन इंडिया’*च्या माध्यमातून जागतिक स्तरावर उत्पादन करण्याचे आवाहन केले. “सुझुकी आणि डायकिनप्रमाणेच तुमच्या कंपन्याही भारतात यशोगाथा लिहू शकतात,” असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले की, “भारतामध्ये राजकीय स्थिरता, आर्थिक स्थिरता आणि धोरणांमध्ये पारदर्शकता आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल.”
Statement against PM : “जितनी गालियां दोगे, उतना कमल खिलेगा”
भारत-जपान सहकार्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जपानी कंपन्यांनी आतापर्यंत ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. मेट्रो रेल्वेपासून उत्पादन, सेमीकंडक्टरपासून स्टार्टअपपर्यंत जपानने भारताच्या विकास प्रवासात मोठा वाटा उचलला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “गेल्या काही आठवड्यांत संसदेत नवीन आणि सरलीकृत कर व्यवस्था मंजूर केली आहे. संरक्षण आणि अवकाशानंतर आता अणुऊर्जा क्षेत्र खाजगी उद्योगांसाठी खुले केले आहे. भारतातील सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाचा हा दृष्टिकोन गुंतवणूकदारांसाठी नवे दालन उघडतो.”
Tiger in BJP – Congress : पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द !
जागतिक भूमिकेबाबत ते म्हणाले की, “जग केवळ भारताकडे पाहत नाही, तर भारतावर अवलंबून आहे. आमच्या बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे. जपानच्या सहकार्याने मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प वेगाने सुरू आहे. आपण मिळून ग्लोबल साऊथ, विशेषतः आफ्रिकेच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.”
मोदी १ सप्टेंबरपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान ते जपानी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. सात वर्षांनंतर मोदी जपानला भेट देत असून, हा दौरा पूर्णपणे द्विपक्षीय अजेंड्यावर आधारित आहे.
___