Breaking

Mohan Bhagwat : ‘अच्छे दिन’ आलेत, आता काही मिळू द्या ही प्रवृत्ती घातक.

RSS chief Mohan Bhagwat said : सरसंघचालक मोहन भागवतांनी सुनावले

Nagpur : इतकी वर्षे मेहनत केली, आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, त्यामुळे आम्हालाही काही मिळाले पाहिजे”, ही प्रवृत्ती घातक अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुनावले आहे. नागपुरातील श्री पांडुरंगेश्वर शिव मंदिर येथे दर्शनानंतर आलेल्या भागवत यांनी शंकराच्या आदर्श जीवनाचा उल्लेख करत, त्याग आणि निःस्वार्थ वृत्तीची गरज अधोरेखित केली. त्यांच्या भाषणातील हा टोला नेमका कुणाकडे होता, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भागवत म्हणाले, शंकराकडे अपार सामर्थ्य असूनही ते विरक्त जीवन जगतात. स्वतःसाठी काही राखून ठेवत नाहीत. भौतिक सुखसोयी इतरांसाठी आहेत. जगाच्या कल्याणासाठी विष प्राशन करण्याची तयारी हा शिवाचा खरा भाव आहे. आज मात्र काहींच्या मनात इतकी वर्षे काम केले, आता काही मिळू द्या अशी प्रवृत्ती वाढली आहे. हा हावरटपणा बदलायला हवा.

MSRTC : माटरगाव न जाता परतणाऱ्या बससमोर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

त्यांच्या मते, जगातील बहुतांश समस्या माणसाच्या हावरटपणा आणि कट्टरपणामुळे निर्माण झाल्या आहेत. “मला पाहिजे, इतरांना मिळाले नाही तरी चालेल” हा स्वार्थाचा दृष्टिकोन, समाजात भेदभाव, राग-द्वेष आणि युद्धाला कारणीभूत ठरतो. उपाय हवा असेल तर ही प्रवृत्ती बदलून साधेपणा, निःस्वार्थ भाव आणि सर्वांसाठी कल्याणाची वृत्ती स्वीकारावी, असा सल्ला त्यांनी दिला.

शिवाच्या पूजनाचा खरा अर्थ सांगताना भागवत म्हणाले, “शंकर वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करतात, पण मनात द्वेष ठेवत नाहीत. सर्वांविषयी प्रेम आणि समन्वय राखणे कठीण आहे, पण ते शक्य आहे. आपला उपयोग जगासाठी व्हावा, हा भाव जपणे हेच खरे शिवपूजन आहे.”

India Alliance meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत !

बदलत्या काळाचा संदर्भ देत ते म्हणाले, “जगात परिवर्तनाची चाहूल आहे. या काळात जर योग्य दिशा घेतली नाही तर हा विनाशाचा काळ होईल. पण योग्य पावले टाकली, तर मानवजातीसमोर उन्नत जीवनाचा नवा मार्ग खुला होईल.” अमृतमंथनाच्या उदाहरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यात जसे अमृताबरोबर विषही निघते,तसे जगातल्या आव्हानांना स्वीकारून त्यातून चांगले निर्माण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्यांच्या या भाषणातील “अच्छे दिन” आणि “काही मिळू द्या” या उल्लेखांमुळे, ते अप्रत्यक्षपणे राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतील सत्ताधारी व पदाधिकारी वर्गाचे कान टोचत आहेत, असे संकेत राजकीय चर्चेत दिले जात आहेत.