RSS chief Mohan Bhagwats clear criticism :सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्ट टीका
Indore : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील वाढत्या खर्चावर थेट भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे. रविवारी इंदूर येथे एका कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, देशातील महागडे शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
भागवत म्हणाले, “ज्ञानाच्या युगात शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी माणूस घर विकायलाही तयार असतो, पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याची त्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे आरोग्यसेवेसाठी तो संपूर्ण बचत खर्च करायलाही तयार असतो, जेणेकरून योग्य उपचार मिळू शकतील. परंतु, दुर्दैवाने आज ही दोन्ही क्षेत्रे स्वस्त नाहीत आणि सहज उपलब्ध नाहीत.”
Chandrashekhar Bawankule : शरद पवार यांची ‘मंडल यात्रा’ म्हणजे नौटंकी, बावनकुळेंची टीका
त्यांनी पुढे सांगितले की, शाळा आणि रुग्णालयांची संख्या वाढत असली तरी त्या सर्वसामान्यांच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे आहेत. “पूर्वी शिक्षण आणि आरोग्य हे सेवेचे साधन होते, परंतु आता त्याचे पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे. एकदा हे क्षेत्र व्यवसायाच्या स्वरूपात गेले की सामान्य माणसाला त्याचा लाभ घेणे कठीण होते,” असे भागवत यांनी स्पष्ट केले.
भागवत यांनी यावेळी एक धक्कादायक आकडेवारीही मांडली. “मी अलिकडेच एक अहवाल वाचला, ज्यात म्हटले आहे की भारतातील शिक्षण व्यवस्था ‘ट्रिलियन डॉलर्स’चा व्यवसाय बनली आहे. जेव्हा कोणतेही क्षेत्र इतके मोठे उद्योगरूप घेते, तेव्हा ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाते.”
Local Body Elections : मतदारसंघ रचनेचा अंतिम मसुदा आज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपवणार
त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा देशभरात खासगी शाळांच्या वाढत्या फी आणि खासगी रुग्णालयांच्या महागड्या उपचारांवर चर्चा सुरू आहे. उपस्थितांनी त्यांच्या वक्तव्याला शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील सुधारणांकडे दिलेला गंभीर संदेश म्हणून पाहिले जात आहे.