The RSS was founded with India at its center : भारताला केंद्रस्थानी ठेवूनच संघाची निर्मिती
New Delhi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत आहे. त्यानिमित्त दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी संघाची भूमिका, उद्देश आणि प्रवास यावर सविस्तर भाष्य केले. भारताला केंद्रस्थानी ठेवूनच संघाची निर्मिती झाली असून देशाला पुन्हा विश्वगुरू करण्यासाठी संघाचे कार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
भागवत म्हणाले, संघाची प्रेरणा संघ प्रार्थनेच्या अखेरीस उच्चारल्या जाणाऱ्या भारत माता की जय या घोषणेतून मिळते. संघाचा आत्मा गाव, समाज आणि राष्ट्र या तीन घटकांमध्ये आहे. वसुधैव कुटुंबकम् हीच संघाची तत्त्वज्ञानाची मूळ प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. संघाची वाढ संथ असली तरी ती दीर्घकाळ टिकणारी आहे. स्वयंसेवकांवरच संघाचे संपूर्ण कार्य उभे असून, तेच नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
Nagpur’s Ganesh festival : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी ‘एआय’, मंडळांना सीसीटीव्ही बंधनकारक !
आपण पारतंत्र्यात असतानाही भारत हे राष्ट्र होतेच. राष्ट्र ही केवळ सत्तेवर आधारित संकल्पना नसून भारतीय राष्ट्राची ओळख ही संस्कृती, परंपरा आणि आत्म्याशी जोडलेली आहे, असे भागवत यांनी स्पष्ट केले. 1857 चा उठाव अपयशी ठरला असला तरी त्यातून भारतीयांमध्ये आत्मभान जागृत झाले. पुढे काँग्रेस उदयास आली, पण स्वातंत्र्यानंतर वैचारिक प्रबोधन करण्यात कमी पडली, असे त्यांनी सांगितले. विवेकानंद आणि दयानंद सरस्वती यांनी भारतीय प्रवाहाला मूळ मूल्यांकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्याच धारेतून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये संघाची स्थापना केली, अशी आठवण भागवत यांनी करून दिली.
Contractor’s protest in Nagpur : देवा भाऊ पैसे द्या, तुमचं जमलं आता आमचं जमवा !
भागवत यांनी हिंदू शब्दाचे मर्म समजावून सांगितले. हिंदू हा केवळ धार्मिक अर्थाने न पाहता तो जबाबदारीचे आणि समावेशकतेचे प्रतिक आहे. माणूस, मानवता आणि सृष्टी हे एकमेकांशी जोडलेले आहेत, ही धारणा हिंदू तत्त्वज्ञानाची आहे. इतरांच्या श्रद्धेचा आदर करणे, अपमान न करणे, धर्मांतर टाळणे आणि सर्वसमावेशकतेने समाज घडवणे हे हिंदू असण्याचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले. भारत माता आणि आपल्या पूर्वजांचा मान ठेवणारा, विविधतेत एकता मानणारा तोच खरा हिंदू असल्याचे भागवत यांनी ठामपणे सांगितले. पूर्वी काहीजण स्वतःला हिंदू म्हणून ओळखत नसले तरी आता बहुतेक सर्वजण ही ओळख स्विकारत आहेत. भारताची परंपरा, संस्कृती आणि डीएनए सर्वांना जोडतो, हेच भारताचे खरे सामर्थ्य आहे.
Maratha movement : आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास मनाई !
संघाचे शंभर वर्षांचे प्रवासाचे टप्पे गाठताना समाजात योग्य माहिती पोहोचवणे हा व्याख्यानमालेचा उद्देश असल्याचे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. भारताला पुन्हा विश्वगुरू बनवण्यासाठी संघाचे कार्य अधिक गतीने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
____