Mohol Vs Dhangekar ::एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद !

BJP leaders warning to Muralidhar Mohol Dhangekars serious claim : मुरलीधर मोहोळांना भाजपश्रेष्ठींचा इशारा? धंगेकरांचा गंभीर दावा

Pune : जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीनविक्री प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठे वारे वाहत आहेत. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या प्रकरणात आरोपांची सरबत्ती सुरूच आहे. शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर पुन्हा निशाणा साधत थेट दावा केला आहे की, “भाजपश्रेष्ठींनी मोहोळ यांना अंतिम इशारा दिला आहे ‘एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा!’”

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारात मुरलीधर मोहोळ यांचे माजी व्यावसायिक भागीदार गोखले बिल्डर्स सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धंगेकर यांनी म्हटले की, या संपूर्ण व्यवहारामध्ये आर्थिक आणि नैतिक गैरव्यवहार झाला असून, “मोहोळ यांनी या प्रकरणातून स्वतःचा आणि पक्षाचा मान वाचवण्यासाठी सत्य लपवले,” असा आरोप त्यांनी केला.

Local Body Elections : सत्ता, संघर्ष आणि रणनीतींचा खेळ,नागपूरच्या राजकारणात ताप वाढतोय!

मोहोळ यांनी या प्रकरणाचा तोडगा १ नोव्हेंबरपूर्वी काढू, असं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी त्यांनी शनिवारी जैन बोर्डिंग हाऊसमध्ये विश्वस्तांची भेट घेतली. मात्र, तेथे जैन समाजाकडून तीव्र विरोध झाला. घोषणाबाजी, संतप्त सवाल आणि महिलांच्या रोषपूर्ण प्रतिक्रिया पाहता मोहोळ यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.

या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावरून मोहोळ यांना लक्ष्य केले. त्यांनी समाज माध्यमावर लिहिले “भाजपश्रेष्ठींचा संदेश स्पष्ट आहे ‘एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा!’”

यासोबतच धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मुरलीधर मोहोळ यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे चौकशी प्रामाणिक व्हायची असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.” अशी मागणी केली आहे

Doctor suicide case : रात्री उशिरा शरणागती, कसून चौकशी सुरू

धंगेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या प्रकरणात मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या आरोपानुसार, ज्या गोखले बिल्डर्सने जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विकत घेतली, तेच मोहोळ यांचे पूर्वीचे व्यावसायिक भागीदार आहेत.

मोहोळ यांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटलं, “जे आरोप करतात त्यांच्याविषयी मी आता सोडून दिलं आहे. काही विषय सोडून दिल्याने सुटतातही,”असं म्हणत त्यांनी या वादाला तात्पुरता थंड प्रतिसाद दिला आहे.

Harshwardhan Sapkal : भाजप म्हणजे दुसरे पक्ष खाणारी चेटकीण!

भाजपच्या अंतर्गत सूत्रांनुसार, केंद्रात मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर सध्या मोठा राजकीय दबाव आहे. पुण्यातील या प्रकरणामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याने, “किंवा प्रकरण सोडवा, किंवा पद सोडा” असा ठोस संदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं सांगितलं जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, “मोहोळ हे संघाशी जवळीक असलेले आणि पक्षातील उगवते नेते आहेत. पण धार्मिक भावनांना धक्का लागणाऱ्या प्रकरणात भाजपला कोणाचंही संरक्षण देणं कठीण जाईल.”

______