weather forecast, strong winds to continue throughout week : हवामानाबाबतचा नवा अंदाज, आठवडाभर जोर कायम राहणार
Mumbai: राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही भागात तुरळक पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामानाबाबतचा नवीन अंदाज वर्तवला आहे. या नुसार राज्यात 20 जून पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून वीज, वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.
नवीन अंदाज नुसार राज्यात 13, 14, 15 जून रोजी दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात जास्त पाऊस पडणार आहे. तसेच 12, 13, 14 जूनला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ पाऊस पडणार आहे. 15 ते 20 जून च्या दरम्यान सगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. यात विज तसेच वारं राहणार आहे.
Ahmedabad plane crash : अकल्पनीय दुर्घटनेत सर्वच उद्ध्वस्त, करोडो रुपयांचं करायचं काय ?
राज्याच्या विविध भागात जोराचा पाऊस पडणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, नगर या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. 13 जून ते 18 जून च्या दरम्यान लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Prahar’s Agitation : बच्चू कडूंना काँग्रेसचा पाठींबा, नेते भेटायला जाणार !
हवामान केंद्र, मुंबई यांनी व्यक्त केलेल्या अंदाजनुसार 13 जून रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात तर दिनांक 14 जून रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर, परभणी व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे 15 जून रोजी नांदेड, हिंगोली जिल्हयात काही ठिकाणी मोठा तर तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.