Monsoon delayed : पाऊस आला, पण मान्सून लांबणीवर!

Agriculture Department appeals not to rush for sowing : कृषी विभाग म्हणतो, ‘पेरणीची घाई करू नका’

Mumbai : महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने पावसाचे वातावरण आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. 14 जूनपर्यंत मान्सूनची शक्यता कमी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तापमान वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगलाच पाऊस सुरू आहे. राज्यातील इतर भागातही पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. अनेक भागात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

Nilesh vs Nitesh Rane: राणे बंधूमध्ये शाब्दिक रण, ‘तुम्ही टॅक्स फ्री आहात’ म्हणताच ‘ती’ पोस्ट केली ‘डिलीट’

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये १४ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तापमान वाढण्याची शक्यता पण वर्तवण्यात येत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून मान्सूनचा प्रवास थांबला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनपर्यंत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे, पश्चिम किनारपट्टी वगळता इतर भागांतील तापमान वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तापमान अधिक राहील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पावसाची वाट पहावी असे हवामान विभाग आणि कृषी जाणकारांचे म्हणणे आहे.

Azad Maidan : सेवानिवृत्त पोलिसांचे आझाद मैदानावर आंदोलन, शासनाने घेतली दखल !

 

विदर्भात तापमान ४५ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा जास्त राहू शकते. मराठवाडा आणि खानदेशातही तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणी आणि लागवड करताना घाई न करण्याचे आवाहन केले आहे. कारण, १४ जूनपर्यंत राज्यात मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. दुपारनंतर काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात पावसाची शक्यता अधिक आहे. इतर भागांमध्ये तुरळक पाऊस पडू शकतो.

“कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये,” असे कृषी विभागाने म्हटले आहे.