Breaking

Mobile tower : देवळीत ‘टॉवर पे टॉवर’, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

More than 200 citizens live within 100 meters of this tower : २०० पेक्षा अधिक नागरिक या टॉवरपासून १०० मीटरच्या आत राहतात

Wardha : देवळीतील प्रभाग क्रमांक २ मध्ये मुख्य रस्त्यालगतच्या एका इमारतीवर कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या तीन महिन्यांपूर्वी एक टॉवर उभारण्यात आला. इतक्यावरच न थांबता त्याच टॉवरपासून अवघ्या दहा फूट अंतरावर दुसरे टॉवर उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या टॉवरमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह नगरपालिका प्रशासनालाही तक्रार दिली आहे. कारवाईची मागणी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २ ही दाट रहिवासी वस्ती आहे. या परिसरात दिलीप कारोटकार यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना विचारात न घेता किंवा त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्या इमारतीवर तीन महिन्यांपूर्वी अनधिकृतरीत्या मोबाइल टॉवर उभारले.

See the world after death : मृत्यूनंतर ‘रूद्र’च्या डोळ्यांनी दोघांना मिळाली ‘दृष्टी’

 

त्यासोबतच आता तेथेच दुसरेही टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. नियमानुसार हे काम बेकायदेशीर आहे. यापासून परिसरातील नागरिकांच्या जीवालाही धोका असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह नगरपालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन या अनधिकृत टॉवरची उभारणी बंद करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनावर डॉ. श्रीकांत निवल, डॉ. वनश्री निवल, अमित भुतडा, प्रशांत निवल, पीयूष काशीकर, शैलेश साल्फेकर, रामदास निवल, भारती साल्फेकर, अपर्णा तडस, निखिल काशीकर, उमेश पवार, वैशाली शेंडे, प्रकाश तडस, प्रकाश पाटील यांच्यासह इतरही नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

Anand Paranjape : माध्यम प्रतिनिधिंनी चुकीच्या, खोडसाळ बातम्या चालवू नये !

 

टॉवरमुळे यांच्यावर होणार परिणाम
या टॉवरच्या आजूबाजूला २५ ते ३० घरे आहेत. जनता प्राथमिक शाळा, बँक, मेडिकल तसेच तीन हॉस्पिटल आहेत. त्यामुळे या परिसरात लहान मुले, गरोदर माता व वृद्धांची सतत वर्दळ असते. २०० पेक्षा अधिक नागरिक या टॉवरपासून १०० मीटरच्या आत राहतात. त्यामुळे या सर्वांवर याचा परिणाम होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे