The face of Akola railway station will change : खासदार अनुप धोत्रे यांचा दावा; सुविधा वाढविण्यावर भर
Akola अकोला रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ४ पर्यंत स्वयंचलित जिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भविष्यात अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहरा बदलणार असून, मध्य आणि दक्षिण रेल्वेच्या माध्यमातून विकासाची नवी पर्वणी सुरू झाली आहे, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
स्थानिक पोस्ट ऑफिसजवळ चढता स्वयंचलित जिना, फलाट क्रमांक दोनवरील लिफ्ट, तसेच फलाट क्रमांक चारवरील उतरता स्वयंचलित जिना यांचे उद्घाटन ३३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणधीर सावरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, वसंत बाछुका, उन्मेष माने, सुभाषसिंह ठाकूर, रेल्वे कमर्शियल अधिकारी रावत, सहायक अधिकारी गिते, स्टेशन मास्तर कवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Ajit Pawar : स्वराज्य सप्ताह, अभिजात मराठी भाषा दिनानंतर राष्ट्रवादी करणार महाराष्ट्र महोत्सव !
मोदी सरकारच्या कार्यकाळात खासदार अनुप धोत्रे यांनी अल्पावधीतच विकासकामांसाठी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे अकोला रेल्वेस्थानकाच्या विकासाला गती मिळाली आहे. संजय धोत्रे यांच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देत, नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यश आले आहे, असे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.
Vijay Wadettiwar : सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यूप्रकरणी सरकारची पोलखोल !
स्वयंचलित जिन्यांमुळे रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत. या सुविधांचा योग्य वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल यांनी महायुती सरकार दळणवळण आणि सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले