Breaking

MP Balwant Wankhede : शेतकऱ्यांचे उत्पादन पोहोचेल थेट ग्राहकांपर्यंत

The goods of the farmers will reach directly to the consumers : खासदार बळवंत वानखेडे यांना विश्वास; कृषी प्रदर्शनाचे आयोजन

Amravati जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे प्रदर्शनाचा उद्देश सफल झाला असून, हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरले आहे, असे मत खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केले.

जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीचा समारोप मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. या कार्यक्रमाला विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्माचे प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील सोसे, प्राचार्य अनिल ठाकरे, हरिभाऊ मोहोड, राजीव ठाकूर, विनय बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते.

Kirit Somaiya : बनावट दाखल्यांच्या प्रकरणात मोठी कारवाई !

खासदार वानखेडे म्हणाले, “प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध ठिकाणी घेतली जाणारी पिके पाहण्याची संधी मिळाली. तसेच, उत्पादनावर प्रक्रिया करून स्वतःच माल विक्री करण्याची संधीही मिळाली. शेतीमध्ये बदलत असलेल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे प्रदर्शन ठरले आहे.”

विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी सांगितले की, “प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी भेट दिल्यामुळे वितरकही समाधानी झाले. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाचे स्वतःच मार्केटिंग करून यशस्वी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.

आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी सांगितले की, *“या प्रदर्शनात एकूण 288 स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्यामध्ये 381 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. एकूण *50 हजार नागरिकांनी भेटी दिल्या, तर 70 लाख रुपयांची उलाढाल झाली.”

Dr. Pankaj Bhoyar : उद्धव ठाकरेंवर जनतेचा विश्वास राहिला नाही

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर ड्रोन पायलट निमिका सुरेश दोडी, पाकसाड काटपिडीया, अमित जयसिंगपूरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, आर. आर. पठाण यांच्या “शेतीमातीच्या कथा” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रदर्शनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश राठोड यांनी केले.