MP Balwant Wankhede : शिवशाही बंद पडली, खासदारांनी जागेवरूनच केला अधिकाऱ्याला फोन

Passengers had to suffer as the Shivshahi got stuck on the road : नादुरुस्त शिवशाहीमुळे प्रवाशांचे हाल; महामंडळाचा ढिसाळ कारभार

Amravati महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या Maharashtra State Road Transport corporation दर्यापूर आगारातील शिवशाही बसगाड्या अत्यंत नादुरुस्त झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शनिवारी दर्यापूर-अमरावती मार्गावर दोन वेगवेगळ्या शिवशाही बस अचानक बंद पडल्या. यामुळे प्रवाशांना अडचणीत सापडावे लागले. ही बाब लक्षात येताच दर्यापूरहून अमरावतीकडे जाणारे खासदार बळवंत वानखडे थेट घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती समजून घेतली आणि तेथूनच थेट महामंडळाच्या अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारला.

पहिली घटना खारतळेगावजवळ घडली. शिवशाही बस (क्रमांक MH 09 EM 2530) मध्ये अचानक धुर निघू लागल्याने ती रस्त्यालगत थांबविण्यात आली. दुसऱ्या घटनेत दुसरी शिवशाही बस (क्रमांक MH 14 HG 8235) वलगाव पोलिस स्टेशनजवळ अचानक बंद पडली. दोन्ही गाड्यांचे रस्त्यात बंद पडल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

Rohini Khadse Sushma Andhare : सरकारने ‘लाडकी बहीण’ मानून प्रिया फुकेंना मदत करावी

या प्रकारामुळे महामंडळाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दर्यापूर आगारातील अनेक शिवशाही बसेस सध्या भंगार स्थितीत असून त्यांचा प्रवासात जीवावर बेततो आहे. प्रवासी या त्रासाला कंटाळून चालक-वाहकांवर राग व्यक्त करतात. प्रत्यक्षात यामध्ये त्यांचा काहीही दोष नसतो, तरीही त्यांना सर्वस्वी जबाबदार धरले जाते.

खासदार बळवंत वानखडे यांनी घटनास्थळी थांबून प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी एसटी विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत दोन्ही अपघातांची माहिती दिली. शिवाय दर्यापूरसह संपूर्ण जिल्ह्यासाठी नव्या, ठणठणीत बसगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

Handloom Corporation Nagpur : हातमाग कामगारांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी

“अशा अपघातांमुळे प्रवाशांचे हाल होतातच, शिवाय लोकप्रतिनिधींची प्रतिमा देखील धुळीस मिळते. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी तातडीने उपाययोजना करा,” असा स्पष्ट इशारा खासदार वानखडे यांनी दिला. प्रवाशांनीही आपली व्यथा खासदारांसमोर मांडत एसटी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.