Railway officials do not respond to MLAs & MPs : बैठकीत व्यक्त झाला संताप, लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देत नसल्याचा आरोप
Nagpur रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत स्वागताची औपचारिकता पार पडल्यानंतर मात्र वातावरण गरम झाले. लोकप्रतिनिधींपैकी अनेकांनी आपापल्या क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पाचा विषय मांडला. त्यासंबंधाने काही अडचणी असेल, त्या मार्गी लावायच्या असेल, तर अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे महाव्यवस्थापकांना सांगितले.
रेल्वेच्या कारभाराविरोधात विदर्भातील लोकप्रतिनिधींनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. आम्हाला प्रकल्पांबाबत माहितीच दिली जात नाही असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांसोबत एक बैठक घेण्यात आली. खासदारांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या रेल्वेच्या विविध विकास कामांचा यात आढावा घेण्यात आला.
Ravikant Tupkar : कर्जमुक्ती पीक विम्यासाठी सिंदखेडराजात ‘क्रांतिकारी’चा एल्गार !
नागपुरात झालेल्या बैठकीला रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे, अमर काळे (वर्धा), संजय देशमुख (यवतमाळ), बळवंत वानखेडे (अमरावती), अनूप धोत्रे (अकोला), डॉ. शोभा बच्छाव (धुळे), राजाभाऊ पराग, प्रकाश वाजे (नाशिक), भास्कर भागरे (दिंडोरी), बंटी साहू (छिंदवाडा) आणि दर्शनसिंग चाैधरी (होशंगाबाद), तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मिना आणि विविध विभागांचे प्रमुख, नागपूर विभागाचे व्यवस्थापक विनायक गर्ग आणि भुसावळ विभागाच्या व्यवस्थापक ईती पांडे उपस्थित होत्या.
Nagpur Municipal Corporation : नाईक तलावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनपाची धडपड!
काही अधिकारी तोऱ्यात वावरतात, असा अनेकांचा सूर होता. ही बैठक सहा महिन्यांपूर्वीच व्हायला हवी होती, ती आता १० महिन्यांनंतर होत आहे. रेल्वे अंडर ब्रीज, लेवल क्रॉसिंग गेट आणि अशाच काही त्रुट्यांबाबत खास. बर्वे यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बर्वे यांनी या बैठकीचा व्हिडीओदेखील त्यांच्या फेसबुकवर अपलोड केला. त्यात ते अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत.