MP Omraje : संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का?

MPs anger, officers reprimanded : खासदाराचा संताप, अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली

Dharashiv : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. “संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? तुम्हाला वाटेल तसं काम करणार? तुम्ही जनतेसाठी काम करत आहात की खाजगी व्यक्तीसाठी?” अशा शब्दांत खासदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

बैठकीच्या सुरुवातीपासूनच खासदार निंबाळकर यांनी जलसंधारण विभागाचे अधिकारी महामुनी यांना प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ते अधिक भडकले. कामे दर्जेदार आणि वेळेवर करा. तुमच्याविरोधात अनेक गंभीर तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. कारभार सुधारला नाही तर कारवाईस तयार राहा, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

GST Reforms : काँग्रेस तंबाखू, गुटख्यावर 5 टक्के कराची मागणी करत आहे का?

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर झालेल्या 32 पैकी फक्त 10 कामे पूर्ण झाली असून उर्वरित 22 पैकी 17 कामे रखडली असल्याचे निदर्शनास आणून खासदारांनी प्रशासनाला जाब विचारला. कामांची गती अत्यंत निराशाजनक आहे, लोक खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे त्रस्त आहेत, असे ते म्हणाले.

तुळजापूर तालुक्यातील एका रस्त्याच्या कामासंदर्भात विचारणा झाल्यावर अभियंत्यांनी भूसंपादनाची अडचण असल्याचे सांगितले. त्यावर खासदार निंबाळकर यांनी थेट भूसंपादन अधिकाऱ्यांना फटकारले. सहा पत्र पाठवूनही तुम्ही कार्यवाही करत नाही, याचा अर्थ कारभार ढिसाळ आहे. हा प्रश्न तातडीने सोडवा, असा आदेश त्यांनी दिला.

Working hours : कामकाजाचे तास वाढले, दिवसाला 12 तर आठवड्याला 60 तास !

 

या बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सीईओ डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प अधिकारी मेघराज पवार यांची उपस्थिती होती. मात्र, बहुतेक आमदार अनुपस्थित असल्याचे स्पष्ट दिसून आले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या या संतप्त भूमिकेमुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाविरोधात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

___